एक्स्प्लोर

Bhandara News: वाघाच्या हल्ल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांवरच केला प्राणघातक हल्ला; सात तासानंतर वाघ जेरबंद

Bhandara News:  वाघाने ग्रामस्थांवर हल्ला केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पाहणी करण्यास आलेल्या वन अधिकाऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर वनविभागाने सात तासांत वाघाला जेरबंद केले.

Bhandara News:  भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील खातखेडा इथं वाघानं हल्ला केल्यान ईश्वर मोटघरे (62) यांचा मृत्यू झाला होता. ही घटना बुधवारी सकाळी घडली. यानंतर गावात पोहचलेल्या वनाधिकाऱ्यांवर संतप्त ग्रामस्थांनी प्राणघातक हल्ला केला. यात सहायक वनसंरक्षक यांच्यासह दोन वन कर्मचारी गंभीर जखमी झालेत. तर, वाघाला बघण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर वाघानं हल्ला करून गंभीर जखमी केलं. ग्रामस्थांच्या हल्ल्यात जखमी झालेले तीन वनाधिकारी आणि वाघाच्या हल्ल्यातील एक ग्रामस्थ अशा चौघांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आलं आहे.

वाघाच्या हल्ल्यात ईश्वर मोटघरे (62) यांचा मृत्यू झाला. तर, निखिल गुरुदास उईके (22) रा. नांदीखेडा हा तरुण गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांच्या हल्ल्यात सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार (57), शैलेश देवेंद्रप्रसाद गुप्ता (56), दिलीप वावरे (52) हे गंभीर जखमी झालेत. या गंभीर चौघांना पवनी येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आलं आहे. पवनी तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खातखेडा हे गाव जंगल व्याप्त परिसरात आहे. तीन दिवसांपूर्वी या परिसरातीलच गुडेगाव या गावातील एका वाघानं हल्ला करून ठार केलं होतं. तेव्हापासून या परिसरातील ग्रामस्थांनी वाघाचा तातडीनं बंदोबस्त करावा, अशी मागणी रेटून धरली होती. मात्र, वाघाच्या बंदोबस्तापूर्वीच बुधवारला सकाळी पुन्हा एकदा वाघानं हल्ला करून इसमाला ठार केले. 

या घटनेनंतर पंचक्रोशीतील गावातील नागरीक घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती होताच वनविभागाचे अधिकारी आपल्या पथकासह खातखेडा गावात पोहोचले. यावेळी ग्रामस्थांच्या संतापाला वनाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनाधिकाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात सहाय्यक वनसंरक्षक यशवंत नागुलवार हे गंभीर जखमी झालेत. तर अन्यही गंभीर जखमी झालेत. दरम्यान, ग्रामस्थांचा रोष बघता वनाधिकारी मिळेल त्या दिशेने सैरावैरा पळाले. 

घटनेची माहिती होताच, जिल्ह्यातील संपूर्ण वनपरिक्षेत्राधिकारी त्यांचे पथक, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची रॅपिड ॲक्शन टीम दाखल झाली. पोलिसांचा तगडा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला. ग्रामस्थांचा रोषाला सामोरे जावे लागल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं वाघाचा शोध घेत त्याला ट्रँग्यूलाईज करून सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास जेरबंद केलं. वाघाला जेरबंद केल्यानंतर ग्रामीण ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. यामुळं या वाघाच्या हल्ल्यानं शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलं होतं. वाघ जेरबंद झाला असला तरी, आता वनाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या ग्रामस्थांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 1 ऑक्टोबर 2024 :  ABP MajhaMVA Seat Sharing : महाविकास आघाडी याच आठवड्यात जागावाटप पूर्ण करणारABP Majha Headlines :  11 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : राज्यातील सरकार बैलपुत्र, बुद्धीही बैलाचीच; गोमातेबाबतच्या निर्णयावरून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
धुळ्यातील गिरासे कुटुंबीयांच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, मृत पतीवर गुन्हा दाखल
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
Mumbai Crime News : क्षुल्लक कारणावरुन वादाची ठिणगी, 80 वर्षीय बापानं लेकाला संपवलं, दादरमध्ये धक्कादायक प्रकार
क्षुल्लक कारणावरुन वाद, बापानं लेकाला संपवलं, मुंबईतील दादरमध्ये खळबळजनक घटना
Govinda Gunfire: रिव्हॉल्व्हरची गोळी लागून गोविंदाच्या पायातून प्रचंड रक्तस्त्राव, तातडीचं ऑपरेशन, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
अभिनेता गोविंदा रिव्हॉल्व्हरची गोळी लागून जखमी, कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Govinda Gunfire: अभिनेता गोविंदा बंदुकीची गोळी लागून जखमी, गोळी पायात नेमकी कशी शिरली, संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
अभिनेता गोविंदाला रिव्हॉल्व्हरची गोळी कशी लागली? पहाटेच्या वेळचा संभ्रमात टाकणारा सस्पेन्स
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
'15 लाख रुपये दे नाही तर...', पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्यास लुटलं, बारामतीतील धक्कादायक प्रकार
Embed widget