एक्स्प्लोर

Bhandara News : दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी, वडिलांचा मृत्यू, मायलेक गंभीर जखमी

Bhandra News : किरकोळ वाद भंडाऱ्यामधील एका कुटुंबाच्या जीवावर बेतल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे.

भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्ह्यात सध्या हत्येचं सत्र सुरुच आहे. तर मागील सहा महिन्यांमधील भंडारा जिल्ह्यामधील ही चौथी घटना आहे. घराशेजारील लहान मुलांच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यामध्ये शालिकराम यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.  या घटनेमुळे भंडारा जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतयं. दरम्यान या प्रकरणातील आरोपील भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

नेमकं काय घडलं?

घराशेजारी लहान मुलं खेळत असताना त्यांच्यामध्ये काहीसं भांडण झालं. लहान मुलांचं हे भांडण थेट कुटुंबापर्यंत पोहचलं. इतकचं नव्हे तर हाच वाद कुटुंबाच्या जीवावर देखील बेतला. एका लोखंडी रॉडनं या कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेमध्ये ज्या कुटुंबावर हा हल्ला करण्यात आला त्यामधील शालिकराम सहारे 65 वर्ष यांचा मृत्यू झाला. तर पत्नी मिरा सहारे वय 60 आणि त्यांचा मुलगा किशोर सहारे वय 40 यांचा मृत्यू झाला. दरम्यान शालिकमार यांच्या घराशेजारी आरोपी अक्षय शाहू याचा मुलगा खेळत होता. मुलं गोंधळ करतात म्हणून शालिकराम यांनी अक्षयच्या मुलाला मारलं.  त्या रागातून अक्षय आणि शालिकराम यांच्या कुटुंबात वाद झाला. त्याच वादातून अक्षयने शालिकराम यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. 

जेव्हा अक्षयने शालिकराम यांच्यावर हल्ला केला तेव्हा शालिकराम यांची पत्नी आणि मुलगा मध्ये पडले. त्यांच्यावर देखील अक्षयने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शालिकराम यांचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान ही घटना घडल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढळा. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास अक्षय शाहू याचा मुलगा खेळत होता. त्याचवेळी शालिकराम यांनी त्याला मारलं. त्याच रागातून अक्षयने शालिकराम यांच्यावर हल्ला केला. 

पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून देखील तपास सुरु करण्यात आला आहे. तर शालिकराम यांची पत्नी आणि मुलगा किशोर सहारे याला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनेची माहिती घटनेची माहिती मिळताच, जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल, पोलीस निरीक्षक गोकुल सुर्यवंशी, एलसीबी पोलीस निरीक्षक नितीन चिंचोलकर हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहचले. दरम्यान पोलीस पथकाने फरार अक्षयला खात रोडवरून ताब्यात घेतलं आहे. 

हेही वाचा : 

Bhandara Crime : भंडाऱ्यात मोक्काच्या आरोपीची गोळ्या झाडून हत्या, वाळूच्या व्यवसायातून वाद झाल्याचा अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray Bike Rally : प्रचाराचा शेवटचा दिवस, आदित्य ठाकरेंची भव्य बाईक रॅलीPratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget