एक्स्प्लोर

Vinayak Mete : विनायक मेटे यांच्या अपघातानंतरच्या घटनांची चौकशी करा, पत्नी ज्योती मेटे यांची मागणी

Vinayak Mete Wife Jyoti Mete : विनायक मेटे यांच्या अपघातानंतरच्या घटनांची चौकशी करा, पत्नी ज्योती मेटे यांची मागणी.

Vinayak Mete Wife Jyoti Mete : विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघातानंतर दोन तासांत काय घडलं? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे. बीडमध्ये एबीपी माझानं ज्योती मेटे यांच्याशी बातचीत केली तेव्हा त्यांनी अपघातानंतर घडलेल्या घटनांबाबत संशय व्यक्त केला आहे. अपघातानंतर काय घडलं याची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. 

ज्योती मेटे बोलताना म्हणाल्या की, "साहेबांशी बोलणं परवा झालं. त्यावेळी त्यांनी 15 ऑगस्ट रोजी बैठक असल्याचं सांगितलं. मी त्यांना रात्री प्रवास करु नका असं सांगितलं. त्यांनी मी हेदेखील सांगितलं होतं की, पुण्यात मुक्काम करा आणि पहाटे निघा. ते आमचं शेवटचं बोलणं." पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "शेवटची भेट आमची गुरुवारी झाली. मी नाशिकहून मुंबईला गेले आणि त्यांना मुंबईहून बीडला यायचं होतं. त्यावेळी आम्ही नवी मुंबईपर्यंत एकत्र गेलो. त्यानंतर तिथून मी परत आले."

"मी तिथे गेल्याबरोबर त्यांची पल्स पाहिली. तिथे डॉक्टरही होते. मी त्यांना सांगितलं, मी त्यांची पत्नी आहे आणि डॉक्टरही आहे. त्यांनी मला परवानगी दिली. मी पल्स चेक केली, त्यानंतर मानेची पल्स चेक केली. ईसीजी समोर फ्लॅट दिसत होता. त्यावेळी मी माझ्या भावाला सांगितलं, हे थोडा वेळात गेलेले नाहीत. अपघातानंतरच्या वेळाची चौकशी होणं गरजेचं आहे.", असं त्या म्हणाल्या. 

"लग्न झाल्यापासून मी साहेबांचं काम पाहतेय. समाज, मग तो कोणताही असो. खासकरुन मराठा समाज त्यांच्या अजेंड्यावर होताच. थोडक्यात सांगायचं तर त्यांचा समाजकार्याचा पिंड होता आणि त्या समाजकारणानंच त्यांचा बळी घेतला.", असं त्या म्हणाल्या. त्यांच्या जाण्यानं आम्ही आणि अख्खा शिवसंग्राम परिवार पोरका झाला आहे. मी माझ्या परिनं शिवसंग्राम परिवाराला हमी देईन की, माझ्या परिनं मी त्यांची काळजी घेईन, असंही त्या म्हणाल्या. 

कसा झाला अपघात? 

विनायक मेटे आज पहाटे बीडवरुन मुंबईला येत असताना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली. विनायक मेटे हे मागच्या सीटवर डाव्या बाजूला बसले होते. पुढच्या सीटवर ड्रायव्हरच्या बाजूला त्यांचा बॉडीगार्ड होता. मेटे यांची गाडी हायवेच्या मधल्या लेनमध्ये होती. 10 चाकी ट्रक हा तिसऱ्या लेनला चालत होता. या ट्रकचालकाने तिसऱ्या लेनमधून मधल्या लेनमध्ये येणाचा प्रयत्न केला. यावेळी मेटे यांची गाडी वेगात होती. अचानक ट्रक मधे आल्यानं वेगानं मेटे यांची गाडी ट्रकला धडकली. चालकाला गाडी कंट्रोल करणं जमलं नाही. मेटे यांची गाडी डाव्या बाजूने ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. मेटे यावेळी झोपेत होते, त्यामुळं त्यांना काही कळायच्या आत वेगाने धडक बसल्यानं डोक्याला मार बसला. यात मेटे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर बराच वेळ मेटे यांना मदत मिळाली नाही. या अपघातानंतर ट्रकचालक हा फरार झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून याचा तपास सुरू केला होता. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget