Walmik Karad: वाल्मिक कराडला स्पेशल ट्रिटमेंट द्यायला कोर्टाचा नकार, कोठडीत असिस्टंट देण्याची मागणी फेटाळली
Walmik Karad: वाल्मिक कराड यांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे, खाजगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी त्याने मागणी केली होती.
Beed News : पवनचक्कीला दोन कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणीच्या गुन्ह्यातील आरोपी, तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे अपहरण करून हत्या प्रकरणाचा ठपका असलेला वाल्मिक कराड (Walmik karad) याने न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्याने आपल्याला एक स्लीप ॲप्निया नावाचा आजार असून त्यासाठी आपल्याला एक मदतनीस मिळावा अशी मागणी या याचिकेतून केली होती. ती मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. वाल्मिक कराड यांची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे, खाजगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी त्याने याचिका दाथल केली होती. मात्र, असा खाजगी व्यक्ती कोठडीत असलेल्या आरोपी सोबत ठेवता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
24 तास मदतनीस देण्याची मागणी
वाल्मिक कराडकडून न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती होती. वाल्मिक कराडने आपल्याला स्लीप ॲप्निया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे. ऑक्सीजनसारखं मशीन त्याला दररोज लावलं जात ते चालवण्यासाठी आपल्याला सीआयडी कोठडीत 24 तास मदतनीस देण्याची मागणी कराडने केली होती. रुग्णाला अशावेळी ऑटो सीपॅप ही मशीन झोपताना लावली जाते. मशीन लावण्यासाठी मदतनीस हवा असल्याची न्यायालयाकडे विनंती केली होती.
सलग तिसऱ्या दिवशी चौकशी सुरू
वाल्मिक कराड याची तिसऱ्या दिवशी सीआयडी चौकशी सुरू आहे. केज शहरात सीआयडी कडून चौकशी सुरू आहे. बीड शहरातील शहर पोलीस स्टेशनमध्ये सीआयडी कस्टडीत असलेल्या वाल्मीक कराडची तिसऱ्या दिवशी सीआयडीने चौकशी चालू ठेवली आहे.
'स्लीप एपनिया' आजार नेमका काय?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्लीप एपनिया ही एक गंभीर समस्या आहे, या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला झोपेच्या वेळी श्वास घेणे बंद होते. तुमचा मेंदू पुरेसा जागृत राहून तुमचे रक्षण करण्याचे काम करत असताना, ही समस्या तुमच्या झोपेत व्यत्यय आणते. स्लिप एपनियासारख्या गंभीर समस्येवर वेळेवर उपचार मिळणे फार महत्वाचे आहे, कारण कालांतराने ही स्थिती गंभीर गुंतागुंत होण्याचे प्रमुख कारण बनू शकते. जर तुम्ही यावर योग्य उपचार केले तर स्लिप एपनियासारख्या गंभीर समस्यांपासून सहज सुटका मिळवू शकता, कारण स्लिप एपनिया सारखी स्थिती पूर्णपणे नियंत्रित केली जाऊ शकते. स्लिप एपनिया सारख्या परिस्थिती उद्भवण्याची मुख्य कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.
कोणत्या लोकांना स्लीप एपनियाचा धोका जास्त असू शकतो?
सामान्यतः, जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये त्याचा धोका जास्त असतो.
अनुवांशिक किंवा कौटुंबिक समस्या असलेल्यांना मोठ्या प्रमाणात धोका असू शकतो.
संशोधनानुसार, झोपेशी संबंधित या समस्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतात.
टॉन्सिल्स असलेल्या काही मुलांमध्येही या प्रकारची समस्या दिसून येते.