एक्स्प्लोर

Walmik Karad Audio Clip : सनीला गुतवू नका, वाल्मिक कराडचा PI ला फोन, कथित ऑडिओ क्लिपमध्ये काय काय?

Walmik Karad Audio Clip, Beed : वाल्मिक कराडची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

Walmik Karad Audio Clip, Beed : वाल्मीक कराड (Walmik Karad) आणि बीड शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ (Shital Kumar Ballal) यांचा ऑडिओ कॉल सध्या व्हायरल होतोय.  या मोबाईल कॉलमध्ये गुन्हेगार सनी आठवले याच्यावर कारवाई करू नका. "त्याला कशात गुंतवू नका. तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरीही तो माझ्या भावासारखा आहे. सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेश याचे जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे गेला आहे", असा संवाद व्हायरल झाला आहे. सनी हा सराईत गुन्हेगार आहे. आणि त्याच्या संबंधी वाल्मीक कराड आणि पोलीस निरीक्षक शितकुमार बल्लाळ यांच्यात थेट संवाद झाला असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. (एबीपी माझा या व्हायरल क्लिपची पुष्टी करत नाही )

दरम्यान सदर क्लिप खोटी आहे. क्लिप मधील संवाद माझा नाही, असं स्पष्टीकरण बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी दिलंय. सनी आठवले हा गुन्हेगार आहे. त्याचा भाऊ देखील गुन्हेगार आहे. सनी आठवले सध्या फरार आहे.  यातील आवाज माझा नाही. याप्रकरणी मी गुन्हा दाखल करणार आहे, असंही पोलीस निरीक्षक शितल बल्लाळ म्हणाले आहेत. 

ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सनी आठवलेची पोस्ट काय काय म्हणाला?

कॉल रेकॉर्डिंग सोबत पोस्ट केलेली जशास तशी...

बीडमध्ये नेमकं चाललय काय? का मला गुंतविले जातंय? खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत? देशद्रोहासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उध्वस्त केले जाते? देशद्रोहाचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेले बरे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे वाल्मीक अण्णा कराड यांचे मित्र असून मी ना.धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडलो गेले होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सोबत तीन ते चार वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मीक अण्णा कराड यांना माझा राग आल्याने सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतविण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना दिले होते. त्यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम 107 मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलावले होते. मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलविण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनामधे धरत व अण्णाच्या सांगण्यावरून बनावट नोटा छापाईच्या प्रकरणांमध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आले आहे.

दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून असंख्य मित्र जोडलेले आहेत बनावट नोटा छपाई प्रकरणी मनीष क्षिरसागर हा माझा मित्र आहे परंतु तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाही. वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ हे काम करत आहेत. माझ्यावर बनावट नोटा छापाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मीकांना कराड यांना फोनद्वारे संपर्क साधला व मी आमदाराचे काम करत आहे माझं चुकलं मला माफ करा असे बोलल्यानंतर लागलीच वाल्मीक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना फोन करून "त्या सनीला नका गुतवू संशयितमध्ये झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला लागलंय जावुद्या द्या विषय सोडून" अरे अण्णा सनी बद्दल शिफारस करू नका संदीप क्षिरसागर शिफारस करत आहे. अशा आशयाची रेकॉर्डिंग मी माझ्या फेसबुक अकाउंट वरून आपणास शेअर करत आहे.

या अगोदर पोलीस उपनिरीक्षक केजः राजेश पाटील, चंद्रभान गीते यांनी अक्षय आठवले यास मादळमोही या ठिकाणाहून अटक केले होते परंतु एफ.आय.आर मध्ये केज तालुक्यातील बरड फाटा येथे अटक केल्याचे दाखवले आहे याबाबत पुराव्यानिशी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे तक्रार सादर केले असून त्यामध्ये पाडळशिंगी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज जोडण्यात आलेले आहेत सदर प्रकरणी वाल्मीकांना कराड यांनीच या खोट्या गुन्ह्यांमध्ये माझे नाव जाणीवपूर्वक टाकले होते. अशा पद्धतीने वाल्मीक अण्णा कराड यांनी असंख्य युवकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनला फोन करणे गुन्हा वापस घेणे बाबत सांगणे आणि मग गुन्हा दाखल झाल्यानंतर तो युवक पुन्हा त्यांचं काम करायला लागतो अशा पद्धतीने त्यांनी माझाही मिस युज करायचा प्रयत्न केला होता परंतु ते मला आवडले नसल्याने मी नामदार धनंजय मुंडे यांच्यापासून दूर आलो होतो. आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश आण्णा धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई दमानिया, सोशल मीडियावरील माझा मित्रपरिवार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, युट्युब चॅनेल्स, या क्लिपच्या माध्यमातून मला न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा बाळगतो मी गुन्हेगारी सोडून सामाजिक क्षेत्रात काम करत आहे हेच यांना खुपत आहे.

आणि आठवले गॅंग हा शब्द वापरू नये ही कळकळीची विनंती आम्ही गुन्हेगारी सोडून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहोत परंतु राजकीय आसरा घेत पोलीस प्रशासनातील काही अधिकारी-कर्मचारी जातीय द्वेष सामोरे ठेवून आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी माझ्या घरी येऊन तुमच्या आशिष अक्षय आणि सनी यांना नको का लावणार आणि देशद्रोहासारख्या गुन्ह्यामध्ये आत मध्ये टाकणार आणि त्याची शिफारस मीच करणार अशा पद्धतीची धमकी दिली होती यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे रीतसर तक्रार माझ्या आईने दिलेली आहे. ती ही आपणास शेअर करतो.

सध्या पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ हे वाल्मीक अण्णा कराड यांचे काम करतात. गेल्या अनेक दिवसापासून शहर पोलीस स्टेशन येथील लॉकअप मध्ये त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट पुरवतात एस पी साहेब आपण याकडे ही लक्ष द्यावे आणि पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या मोबाईलचा डम डाटा सीडीआर तपासावा जेणेकरून आपणास लक्षात येऊन जाईल की वाल्मीक अण्णा कराड व पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांचे मैत्रीचे संबंध आहेत म्हणून तर प्रत्येक वेळी शितल कुमार बल्लाळ हे वाल्मीकांना कराड सोबत असतात. मग ते माध्यम कोणतेही असो आणि पोलीस निरीक्षक बल्लाळ यांचेही कारनामे एस पी साहेबांनी पाहावे. गोंदी येथील झालेला प्रकार माजलगाव येथील झालेला प्रकार खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांच्यावर बडतर्फीची कारवाई होणे अपेक्षित आहे. 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल

 

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ

व्हिडीओ

Operation Lotus : ऑपरेशन कमळ, शिंदेसेनेत खळबळ? अधिवेशनाचा पहिला दिवस, ठाकरेंचा बॉम्ब Special Report
Vande Mataram Controversy : 'वंदे मातरम', नेहरु आणि राजकारण; मोदींचा हल्लाबोल Special Report
Cast Politics : जात कोणती? मानसिकता कोती? मनात जातीयता पेरण्याचा प्रयत्न Special Report
Aaditya Thackeray VS Bhaskar Jadhav : जाधवांचं नाव, ठाकरेंचाच भाव? ठाकरेंच्या मनात कोण? Special Report
Jayant Patil Majha Vision : पार्थ पवार प्रकरण ते भाजप प्रवेशाची चर्चा ; जयंत पाटील EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
इंडिगोची सेवा विस्कळीत! फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटी रुपयांचा फटका, शेतकरी चिंतेत
Baba Adhav : हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
हमाल पंचायत ते 'एक गाव एक पाणवठा'; कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आयुष्य झिजवणारा लढवय्या हरपला; कोण होते बाबा आढाव?
Navjyot Kaur Sidhu नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
नवज्योत कौर सिद्धूंचे काँग्रेसमधून तडकाफडकी निलंबन; 500 कोटींचं वक्तव्य भोवलं
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
कष्टकऱ्यांसाठी लढणारे ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांचं निधन
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
तुकाराम मुंढेंच्या नावाने धमकी, भाजप आमदार कृष्णा खोपडेंची पोलिसांत धाव, विधानसभा अध्यक्षांनाही पत्र
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
धक्कादायक! शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू, पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात घटना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget