आता राष्ट्रपतींकडे अर्ज गेला तरी... मकोका कोर्टातील 'त्या' गोष्टीमुळे वाल्मिक कराडच्या अडचणी कशा वाढल्या? सुरेश धसांनी सांगितलं कारण
Suresh Dhas:'धनंजय मुंडे आणि आका शोलेतल्या कॉईनसारखे आहेत. छापा पण हेच आणि काटा पण हेच . कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणांमध्ये प्रमुख सुत्रधार, मेन गँगस्टर, मास्टरमाईंड असे सगळे शब्द वापरले आहेत.

Suresh Dhas on Walmik karad : सरपंच संतोष देशमुख प्रकरणात बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने दोषमुक्तीचा आरोप फेटाळल्यानंतर वाल्मिक कराडला दोषमुक्ती न देण्यामागे काही निरीक्षणे नोंदवली . वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मकोका कोर्टानं म्हणटलंय . यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय . अगदी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज गेला तरी कोर्टाचं आजचं निरीक्षण महत्वाचं आहे . हे निरीक्षण कुणालाही वाचवू शकणार नाही असं आमदार धस म्हणालेत. दोन्ही आका हे शोलेच्या कॉईनसारखे आहेत. छापा पण हेच काटा पण हेच.. असंही त्यांनी म्हटलं. (Suresh Dhas)
काय म्हणाले सुरेश धस ?
कोर्टाच्या निरीक्षणांवर आ . सुरेश धस म्हणाले, ' धमक्या देणं, खंडणी वसूल करणं याची आकाला सवयच लागली हाेती. आवादा कंपनीला आकाच्याच सांगण्यावरून मे महिन्यामध्ये अपहरण करण्यात आलं होतं. त्यांनतर कोर्टानं दोन जणांवर गुन्हा दाखल झाला होता. नंतर पाथर्डी तालुक्यात त्यांना सोडून देण्यात आलं. ही खंडणी वसूल करताना त्यात संतोष देशमुख का आले म्हणून संतोष देशमुखांचा खून या लोकांनी केला आहे. ही गोष्ट माननीय न्यायालयाच्या लक्षात आली आहे. मारायला आलेले लोक यांचेच आहेत. कराड हेच मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मकोका कोर्टानं म्हणटलंय .दोषमुक्तीचा अर्ज या केस मध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी आला .. केस लांबवण्याचे प्रयत्न झाले .मकोका कोर्टानं नोंदवलेलं महत्वाचं निरीक्षण म्हणजे मुख्य सूत्रधार आकाच असल्याचं म्हटलंय .अगदी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज गेला तरी कोर्टाचं आजचं निरीक्षण महत्वाचं हे निरीक्षण कुणालाही वाचवू शकणार नाही .
धनंजय मुंडेंना क्लिन चीट मिळाली का?
'दोन्ही आका शोलेतल्या कॉईनसारखे आहेत. छापा पण हेच आणि काटा पण हेच . कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणांमध्ये प्रमुख सुत्रधार, मेन गँगस्टर, मास्टरमाईंड असे सगळे शब्द वापरले आहेत. धनंजय मुंडेंनी जो दावा केला होता तोच न्यायालयानं खोडून काढला .धनंजय मुंडेंना एकाच खरेदीत क्वीन चिट मिळालीय... धनंजय मुंडेंना मिऴालेल्या क्लीन चिट विरोधात मी स्वतः सुप्रीम कोर्टात जाण्याचा प्रयत्न करणार' असल्याचंही आमदार धस म्हणाले .
बीड मकोका कोर्टानं काय निरीक्षणं नोंदवली?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचे निरीक्षण विशेष मकोका न्यायालयाने नोंदविले आहे. वाल्मीक कराडने आपण दोषी नसल्याचा दोष मुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला होता. या अर्जावर निर्णय देत न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवली आहेत. वाल्मिक कराडला दोष मुक्त का केले जात नाही? याबाबत हे निरीक्षण नोंदवले गेले आहे. वाल्मीक कराडला दोष मुक्त केला जात नाही याचं कारण सांगताना न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवली .
- वाल्मिक कराड टोळीचा म्होरक्या आहे. तो घटनेचा मुख्य सूत्रधार असून संतोष देशमुख खंडणीच्या अडसर आले म्हणून अपहरण करत कट रचून हत्या केल्याचं समोर आले आहे .
- वाल्मीक कराडवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून मागील 10 वर्षात गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.
- आवादा एनर्जी प्रकल्प चालकाला धमक्या देणे. त्याचबरोबर महत्त्वाचे साक्षीदार आणि गोपनीय जबाब डिजिटल एव्हिडन्स फॉरेन्सिक पुराव्या आधारे वाल्मीक कराडला दोषमुक्त करण्यात येत नसल्याचं न्यायालयाचे म्हणणे आहे.
























