एक्स्प्लोर

Silk Farming: मराठवाड्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचे 'अच्छे दिन'; 'या' बाजारपेठ मिळतोय 'सोन्या'चा दर

Silk Farming: बीडच्या बाजार समितीमध्ये दिवसाला सात ते आठ टन रेशीम कोषाची खरेदी करण्यात येते.

Silk Farming : राज्यात सर्वाधिक रेशीम कोष निर्मितीमध्ये आघाडीवर असलेल्या बीड (Beed) जिल्ह्यामध्ये रेशीमला विक्रमी भाव मिळत आहे. पांढऱ्या रेशीम कोषाला तब्बल पाच हजार आठशे रुपयांचा भाव मिळतोय. विशेष म्हणजे बीडच्या बाजार समितीमध्ये दिवसाला सात ते आठ टन रेशीम कोषाची खरेदी करण्यात येते. या खरेदी केंद्रावर बीड जिल्ह्यातीलच नाही, तर शेजारील जालना परभणी जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा रेशीम कोष विक्री करण्यासाठी आणत आहेत. त्यामुळे मागच्या अनेक महिन्यांमध्ये रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अच्छे दिन आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

बीडमध्ये असलेल्या बाजार समितीच्या रेशीम खरेदी केंद्रावर फक्त बीडच नव्हे, तर इतर जिल्ह्यातले शेतकरी देखील रेशीमची विक्री करण्यासाठी येत आहेत. तीन महिन्यापूर्वी बीडच्या बाजार समितीमध्ये नवीन संचालक मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बंद पडलेलं रेशीम खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं. त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना इतर ठिकाणी जाण्यापेक्षा आपल्या जिल्ह्यात रेशीम विक्रीसाठी एक हक्काची बाजारपेठ निर्माण झाली आहे.

दुष्काळ आणि गारपिटीमुळे शेतीचे सतत होत असलेले नुकसान लक्षात घेता बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आता रेशीम शेतीची कास धरली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा हा रेशीम शेतीच हब ठरत आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना रेशीमची विक्री करण्यासाठी जालना किंवा बेंगलोरच्या रामनगर या मार्केटमध्ये जावं लागायच. त्यामुळे त्यांचा वाहतुकीचा खर्च जास्त होत होता.पण, आता बीडमध्येच रेशीम खरेदीची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. तर, या ठिकाणी रेशीम कोषाची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना एक ते दोन दिवसांमध्ये रोख पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक फायदा होत आहे. 

रेशीम कोषाची प्रक्रिया उद्योगही उभारणार...

सध्या मराठवाड्यात असलेल्या रेशीम खरेदी केंद्रापैकी बीड मधल्या रेशीम खरेदी केंद्रावर सर्वाधिक रेशीमची खरेदी केली जात आहे. एका दिवसाला इथे अंदाजे सात टन रेशीम कोषाची खरेदी केली जात असून, बीडसह नांदेड जिल्ह्यातील शेतकरी देखील या ठिकाणी रेशीम विक्रीसाठी येत आहेत. तर,  दुसरीकडे लवकरच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी रेशीम कोषाची प्रक्रिया उद्योग देखील बाजार समितीच्या वतीने उभा करण्यात येणार आहे.

फसवणूक टळणार...

पूर्वी बीड जिल्ह्यातले शेतकरी हे बेंगलोरच्या रामनगर मार्केट किंवा जालना या ठिकाणी रेशीम कोषाची विक्री करायचे. मात्र, विक्री केल्यानंतरही त्यांना एक ते दोन महिन्यानंतर पैसे मिळायचे. तर, कधीकधी व्यापाऱ्यांकडून या शेतकऱ्यांची फसवणूक देखील केली जायची. मात्र, आता बीडमध्ये हक्काची बाजारपेठ निर्माण झालं आहे. या ठिकाणी 40 ते 50 हजार रुपये क्विंटलचा भाव रेशीमला मिळत असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Success Stories : कापसाच्या पिकात अंतरपीक म्हणून अख्ख्या गावाने 'मिरची' लावली; एकरी दोन लाखांचा फायदा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेचा विरोध, एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलाल तर खबरदार, बीड जिल्हाप्रमुखाचा इशारा
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याला शिवसेनेचा विरोध, एकनाथ शिंदेंच्या विरोधात बोलाल तर खबरदार, बीड जिल्हाप्रमुखाचा इशारा
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना
मनोज जरांगेंच्या विरोधात बोलतो म्हणून मला मारहाण; अमोल खुणे मारहाप्रकरणी 6 अज्ञातांवर गुन्हा; आरोप फरार, पोलीस पथके रवाना

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget