Beed News: आला धोंड्याचा महिना... परंपरेला छेद देत बीडमध्ये जावयानं दिलं सासू-सासर्यांसह आईला धोंड्याचं गिफ्ट
Beed News: धोंड्याच्या परंपरेला छेद देत बीड शहरातील जावयानं चक्क आपल्या सासू-सासर्यांसह आपल्या आईसाठी धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
Maharashtra Beed News: अधिक मास (Adhika Maas) म्हटलं की, धोंड्याचा महिना आलाच. तीन वर्षातून एकदा येणारा हाच धोंड्याचा महिना नवीन लग्न झालेल्या जावयासाठी पर्वणीच असतो. याच धोंड्याच्या महिन्यामध्ये नवीन जावयाचा सासुरवाडीमध्ये येथेच्च पाहुणचार, नवीन कपडे, स्वादिष्ट भोजन आणि सोन्याची भेटवस्तू देऊन केला जातो. मात्र याच परंपरेला बीड (Beed News) शहरातील मंगेश मुंडे या जावयानं फाटा दिला असून त्यानं चक्क आपल्या सासू-सासर्यांसह आपल्या आईसाठी धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, तर यामध्ये सुनेनं ही सासूबाईंची ओटी भरली.
बीड शहरात राहणारे मंगेश राजेंद्र मुंडे आणि त्यांची पत्नी प्रिया मंगेश मुंडे हे दाम्पत्या नेहमी धार्मिक कार्यक्रमानिमित्त वेगवेगळे उपक्रम घेत असतात. यापूर्वीही दोन वेळा या मुंडे दांपत्याने आपल्या सासू-सासर्यांसाठी धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं, यावेळी त्यांना साडी चोळीचा आहेर आणि सोन्याची भेटवस्तू देखील दिली होती. उपक्रमानंतर सासरे बाबासाहेब गडे यांनी सासू सुदामती बडे यांनी आपल्या मुलीचा आणि जावयाचं कौतुक केलं आहे.
धोंडे जेवणाच्या कार्यक्रमांमध्ये सुहासिनी सासू आणि आईची ओटी भरण्याचा अधिकार मुलीला आणि सुनील आहे. अधिक मासाच्या महिन्यात जर मुलगी किंवा सुनेनं धोंड्याच्या जेवणाच्या निमित्तानं सुवासिनी सासू आईची ओटी भरू शकते तर आई-वडिलांनी सासू-सासरे यांचा देखील तेवढाच सन्मान या अधिक मासात झाला तर त्याचा अधिक पुण्य मिळेल, या भावनेतून त्यांनी परंपरा जपत सुनेनं सासूबाईंची तर जावयानं आपल्या सासू सासऱ्याला धोंडे जेवणाच अनोखं गिफ्ट दिलं आहे.
जावयानं केलेला पाहुणचार पाहून सासू-सासरे भावूक
धोंड्याच्या महिन्यात लेक जावयाला जेवण दिले जाते ही परंपरा आहे मात्र मला लेकीने आरोग्याचे रुटीन चेकअप करण्यासाठी घरी बोलावले आणि त्यानंतर आम्ही दोघेही मुलीच्या घरी आल्यानंतर थोड्याच वेळात कार्यक्रम असल्याचं पाहायला मिळालं आणि आमच्या सोबत विहीणबाई देखील होत्या त्यामुळे जावई व लेकीच्या आग्रहाचा मान ठेवला हे आश्चर्य म्हणावे लागेल लेक जावयाचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याची भावना रजेंद्र मुंडे यांच्या सासू आणि सासर्याने व्यक्त केली आहे.