एक्स्प्लोर

मोठी बातमी! वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार, दुसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या आठ आरोपींचे क्रमांक

Santosh Deshmukh Case: आरोप पत्रामध्ये हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मीक कराड याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर आरोप पत्रात आरोपी क्रमांक दोन वरती विष्णू चाटे याचा उल्लेख आहे.

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार आहे असं पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रामध्ये म्हटलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे आरोपपत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. या आरोप पत्रामध्ये हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मीक कराड याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर आरोप पत्रात आरोपी क्रमांक दोन वरती विष्णू चाटे याचा उल्लेख आहे. त्यानंतर इतर आरोपींची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. 

वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार असल्याचं पोलिसांनी दिलेल्या आरोप पत्रात म्हटले आहे. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादामधून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या आरोप पत्रामध्ये म्हटलं आहे, खंडणी, ॲट्रॉसिटी, हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. 29 नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मीक कराडने खंडणी मागितली होती आणि सहा तारखेला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सांगळे यांच्यासोबत वाद झाला होता असे या आरोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानुसार कराडच्या विरोधामध्ये पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केलेले आहेत. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या या तिन्ही घटनांचा आरोप पत्रामध्ये एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला आहे, संतोष देशमुख यांना संतोष घुले मारहाण करतानाचा व्हिडिओ सीआयडीकडे पोहोचलेला आहे.

कोणत्या आरोपीचा कितवा नंबर

वाल्मिक कराड - एक नंबर
विष्णू चाटे- दोन नंबर
सुदर्शन घुले - तीन नंबर
प्रतीक घुले - चार नंबर
सुधीर सांगळे - पाच नंबर
महेश केदार - सहा नंबर
जयराम चाटे - सात नंबर
फरार कृष्णा आंधळे - आठ नंबर

संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम  

- 6 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि इतर अनोळखी इसमानी आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला आणि अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

- 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. सरपंचाचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

- 10 डिसेंबर रोजी यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करण्यात आला. त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक केली.

- मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेऊन सरपंच देशमुख यांच्या मृतदेहावर 24 तासानंतर अंत्यसंस्कार केले. 

- 11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिक घुले याला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केली.

- 11 डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मीक कराडवर आरोप करत त्याला दोषी ठरवले.

- सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यातील राक्षसी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.

- 11 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड, अजित पवार गटाचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- 12 डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाई करा अशी मागणी केली.

- 13 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.

- त्याच दिवशी, 13 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. 

- 14 डिसेंबर रोजी केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.

- 14 डिसेंबर रोजी आरोपी विष्णू चाटे याची अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली.

- या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी यात न्यायाची मागणी केली. 

- 18 डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याला अटक करण्यात आली. 

- 19 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला. यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं.

- 21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला.

- 21 डिसेंबर रोजी शरद पवार, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

- 21 डिसेंबर रोजी नवनीत कॉवत यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.

- 24 डिसेंबर रोजी मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला.

- 28 डिसेंबर रोजी तीन आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मिक कराडवर खून प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी या मागणीसाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला.

- 30 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्यशोधक आंदोलन केले.

- 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण गेला. त्याच दिवशी उशिरा केज न्यायालयात कराडला हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली.

- 3 जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉ. संभाजी वायबसेला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले.

- 4 जानेवारी रोजी फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली.

- त्याच दिवशी संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून अटक करण्यात आली.

- या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.

धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर केज पोलिस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. या प्रकरणाचाही तपास सीआयडी करत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Embed widget