Santosh Deshmukh Murder Case : आरोपींचे ठसे जुळले, बँक खाते गोठवले; वाल्मिक कराडच्या पासपोर्टबाबत मोठी माहिती; सीआयडीच्या तपासात 5 मोठे खुलासे
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर 5 मोठे खुलासे झाले आहेत.
Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा (Santosh Deshmukh Murder Case) तपास काही दिवसांपूर्वी सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. सीआयडीच्या तपासातील जवळपास 5 मोठ्या अपडेट समोर आल्या आहेत. यामध्ये अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवर आरोपींचे ठसे जुळल्या आहेत. याशिवाय आरोपींच्या बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत. याबाबतची माहिती सूत्रांनी दिलीये.
वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित महिलेची चौकशी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडी चे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे. वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेले एका महिलेची आज सकाळपासून चौकशी सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
गाडीत फरार आरोपींचे मोबाईल सापडले
देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवरती आरोपीचे ठसे जुळल्याची झाल्याची माहिती आहे. गाडीत फरार आरोपींचे मोबाईल देखील सापडले असून त्याचा तपास करण्यासाठी पथकाने संबंधित मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आज चार फरार आरोपींचे बँकेचे खाते गोठवण्यात आले आहेत. फरार आरोपींच्या मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयाकडे अर्ज देखील सीआयडी कडून दाखल करण्यात आलाय.
आरोपींकडे असलेला पासपोर्ट मात्र, परदेशात जाण्याचा मार्ग बंद
फरार आरोपींपैकी अद्याप कोणीही अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज केलेला नाही. आरोपींपैकी फक्त एका आरोपीकडे पासपोर्ट आहे. तोही आरोपी अटकेत असल्याने इतर आरोपी परदेशी जाण्याचा अधिकृत मार्ग बंद करण्यात आलाय. या प्रकरणातील सर्वात चर्चेत असलेले आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना पासपोर्टच नसल्याची देखील माहिती समोर आली आहे.
तपासात काय काय समोर आलं?
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत
टीम मध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडी चे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत
या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे
वाल्मीक कराड यांच्याशी संबंधित असलेले एका महिलेची आज सकाळपासून चौकशी सुरू असल्याची देखील माहिती
देशमुख यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या गाडीवरती आरोपीचे ठसे जुळल्याची झाल्याची माहिती
गाडीत फरार आरोपींचे मोबाईल देखील सापडले असून त्याचा तपास करण्यासाठी पथकाने संबंधित मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर आज चार फरार आरोपींचे बँकेचे खाते गोठवण्यात आले
फरार आरोपींच्या मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयाकडे अर्ज देखील सीआयडी कडून दाखल
फरार आरोपींपैकी अद्याप कोणीही अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज केलेला नाही
आरोपींपैकी फक्त एका आरोपीकडे पासपोर्ट तोही आरोपी अटकेत असल्याने इतर आरोपी परदेशी जाण्याचा अधिकृत मार्ग बंद
या प्रकरणातील सर्वात चर्चेत असलेले आरोपी वाल्मीक कराड यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना पासपोर्टच नसल्याची देखील माहिती
इतर महत्त्वाच्या बातम्या