एक्स्प्लोर

Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला एक महिना पूर्ण! हत्येचा घटनाक्रम काय? आतापर्यंत काय-काय झालं? 

Santosh Deshmukh Murder Case Chronology : संतोष देशमुख हत्याकांडाचं मूळ हे पवनचक्की खंडणी प्रकरण असून त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Santosh Deshmukh Murder Case Chronology : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज एक महिना पूर्ण होत आहे. या प्रकरणात केज पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा करण्यात आला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक तसेच सत्ताधारी नेतेही करताना दिसत आहेत. 

संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम  

- 6 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि इतर अनोळखी इसमानी आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृत प्रवेश केला आणि अधिकारी शिवाजी थोपटे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला.

- 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. सरपंचाचे भाऊ धनंजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

- 10 डिसेंबर रोजी यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास अहमदपूर-अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करण्यात आला. त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक केली.

- मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेऊन सरपंच देशमुख यांच्या मृतदेहावर 24 तासानंतर अंत्यसंस्कार केले. 

- 11 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रतिक घुले याला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केली.

- 11 डिसेंबर रोजी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मीक कराडवर आरोप करत त्याला दोषी ठरवले.

- सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यातील राक्षसी प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असून कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली.

- 11 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड, अजित पवार गटाचा केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर केज पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

- 12 डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाई करा अशी मागणी केली.

- 13 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती.

- त्याच दिवशी, 13 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. 

- 14 डिसेंबर रोजी केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.

- 14 डिसेंबर रोजी आरोपी विष्णू चाटे याची अजित पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली.

- या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी यात न्यायाची मागणी केली. 

- 18 डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे याला अटक करण्यात आली. 

- 19 डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला. यात त्यांच्या अंगावर 56 जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालं.

- 21 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली झाली. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला.

- 21 डिसेंबर रोजी शरद पवार, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

- 21 डिसेंबर रोजी नवनीत कॉवत यांची पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली.

- 24 डिसेंबर रोजी मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की येथे झालेल्या मारहाण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला.

- 28 डिसेंबर रोजी तीन आरोपींच्या अटकेच्या मागणीसह वाल्मिक कराडवर खून प्रकरणात गुन्हा नोंदवून अटक केली जावी या मागणीसाठी सर्वपक्षीयांचा मोर्चा काढण्यात आला.

- 30 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सत्यशोधक आंदोलन केले.

- 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण गेला. त्याच दिवशी उशिरा केज न्यायालयात कराडला हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी सुनावली.

- 3 जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉ. संभाजी वायबसेला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले.

- 4 जानेवारी रोजी फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली.

- त्याच दिवशी संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून अटक करण्यात आली.

या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.

आतापर्यंत या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. यात वाल्मिक कराड, त्याची पत्नी, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे  यांची चौकशी झाली आहे.

धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर केज पोलिस ठाण्यात दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. या प्रकरणाचाही तपास सीआयडी करत आहे.

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Mahapalika Akola : अकोला महापालिकेतील प्रमुख नागीर समस्या कोणत्या?Zero Hour Suresh Dhas VS Amol Mitkari : अमोल मिटकरींचे आरोप, सुरेश धसांचे थेट उत्तरZero Hour Mahapalika Chandrapur :अमृत योजनेच्या कामांचा परिणाम, विकासकामांमुळे चंद्रपुरची दुरवस्थाZero Hour Mahapalika Nashik : वाहनं वाढतायंत पण रस्ते तेवढेच, पुण्याच्या रांगेत नाशिकही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget