एक्स्प्लोर

Anjali Damania: परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या, कैलास फडवर गुन्हा दाखल होताच अंजली दमानियांची मोठी मागणी, धनंजय मुंडेंवर हल्लाबोल सुरुच

Anjali Damania on Kailash Phad: कैलास फडवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर दमानियांनी एसपी नवनीत कावत यांचे आभार मानले आहेत, त्याचबरोबर त्यांनी मोठी मागणी केली आहे.

बीड: नकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी परळी शहरातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. परळी मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डला मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. तसेच कोण पोलिस?, कशाचा बॉडीगार्ड असं म्हणत मध्ये कोणीही जायचं नाही म्हणून अंगरक्षकाला बाहेर काढण्यात आलं होतं, नेते माधव जाधव यांनाही मारहाण करण्यात आली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीड पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यांनंतर याची दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणात कैलास फड, त्याचा मुलगा आणि इतर पाच जणांवर परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास फड हा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा कार्यकर्ता आहे. या कारवाईनंतर समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत मोठी मागणी केली आहे. 

अंजली दमानिया यांनी परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या. किती मतदान झाले ते कळेल अशी मागणी केली आहे, त्याचबरोबर त्यांनी एसपी नवनीत कावत यांचे आभार देखील मानले आहेत. 

अंजली दमानिया यांनी सोशल मिडिया पोस्ट

"अखेर 82 दिवसानंतर गुन्हा दाखल! कैलाश फड आणि त्यांच्या मुलावर अखेर गुन्हा दाखल, विधान सभा निवडणुकीत परळी येथे मोठ्या प्रमाणावर गौडबंगाल झाला हे आता स्पष्ट झाले आहे. इलेक्शन कमिशन कडे असे २० ते २५ तक्रारीचे वीडियो आहेत. त्यातील प्रत्येक वीडियो वर कारवाई करा. परळीतील निवडणूक पुन्हा शिस्तीत घ्या. किती मतदान झाले ते कळेल एसपी नवनीत कावत यांचे आभार", अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी शेअर केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूक 2024 च्या मतदानाच्या दिवशी परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये बोगस मतदान होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. याच दरम्यान परळी शहरातील बँक कॉलनी परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर उमेदवार मतदान केंद्रातील माहिती घेत असताना ऍड. माधव जाधव यांना तीन ते चार जणांनी मारहाण केली. माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाल्यानंतर त्याची पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले. घटनांदूर मधील मतदानकेंद्रामध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्राची तोडफोड केली होती. 

परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मतदानादिवशी राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केली होती. मारहाण झाल्यानंतर माधव जाधव यांनी पोस्टाद्वारे तक्रार नोंदवली होती. याच प्रकरणात राजेसाहेब देशमुख यांच्यासोबत असलेल्या पोलीस गार्डचा जबाब घेण्यात आला. त्यानुसार कैलास फडच्या विरोधामध्ये मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
Sushma Andhare : देवेंद्र फडणवीस नागगोळी, उद्धव ठाकरे सुतळी बॉम्ब, तर एकनाथ शिंदे...; फटाक्यांची उपमा देत सुषमा अंधारेंकडून जोरदार राजकीय आतिषबाजी, कुणाबद्दल काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस नागगोळी, उद्धव ठाकरे सुतळी बॉम्ब, तर एकनाथ शिंदे...; फटाक्यांची उपमा देत सुषमा अंधारेंकडून जोरदार राजकीय आतिषबाजी, कुणाबद्दल काय म्हणाल्या?
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
अकलूजच्या घोडेबाजाराला दुष्काळाची झळ; 51 लाखांचा सिकंदर, 25 लाखांचे अनेक घोडे, पण चारा-पाण्याचा प्रश्न कायम
Hardik Pandya : हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंगच्या ट्रेडमध्ये सर्वाधिक फायदा कोणाचा? मुंबई नव्हे पंजाबच फायद्यात, मोहम्मद कैफ म्हणाला...
हार्दिक आणि अर्शदीपच्या ट्रेडमध्ये फायदा कोणाचा? पंजाबचं नाव घेत मोहम्मद कैफ म्हणाला...
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद मला होईल; विलिनीकरणावर ओमराजेंचं वक्तव्य, भरत गोगावलेंचंही सूचक विधान
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
सोलापुरात शिकाऊ विमानाचा उड्डाणापूर्वीच अपघात; महिला वैमानिकाचा थोडक्यात जीव वाचला, धावपट्टीवर धावपळ
दिव्यांगांच्या डब्यात नराधमाचा तरुणीला बॅड टच, जाब विचारताच लोकलसमोर ढकललं, ट्रॅकवर झोपल्यामुळे जीव वाचला, हात तुटला; तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी !
दिव्यांगांच्या डब्यात नराधमाचा तरुणीला बॅड टच, जाब विचारताच लोकलसमोर ढकललं, ट्रॅकवर झोपल्यामुळे जीव वाचला, हात तुटला; तरुणीची थरकाप उडवणारी कहाणी !
NCP Merger: परवा आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडले, आज थेट विरोधात दंड थोपटले, विलिनीकरण नकोच, रोहित पवारांची आक्रमक भूमिका, पुढचा प्लॅन काय ?
परवा आमदारांच्या बैठकीतून बाहेर पडले, आज थेट विरोधात दंड थोपटले, विलिनीकरण नकोच, रोहित पवारांची आक्रमक भूमिका, पुढचा प्लॅन काय ?
Embed widget