एक्स्प्लोर

Police Bharti : पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्याचं 'बीड कनेक्शन'; 33 पैकी 20 जणांना बीडमधून अटक

Beed News : पोलीस भरती पेपर फुटी प्रकरणात एकूण 149 आरोपी असून, यातील 33 आरोपी हे बीड जिल्ह्यातील आहे.

Beed News : काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस भरतीमध्ये घोटाळा (Police Bharti Scam) झाल्याचे समोर आले होते. यावेळी झालेल्या पेपर फुटी प्रकरणांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आता याच प्रकरणात बीड (Beed) कनेक्शन समोर आले आहे. कारण या पेपर फुटीप्रकरणात बीड जिल्ह्यातील तब्बल 33 जणांना समावेश असून, आतापर्यंत पोलिसांनी वीस जणांना अटक केली आहे. तर यामधील 13 आरोपी याद्यापी फरार आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या या पोलीस भरती पेपर फुटी प्रकरणात एकूण 149 आरोपी असून, यातील 33 आरोपी हे बीड जिल्ह्यातील असल्याने पुन्हा एकदा पोलीस भरती पेपर फुटीचा बीड कनेक्शन उघड झाला आहे. 

2019 मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर 2021 मध्ये ही परीक्षा पार पडली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत झालेल्या या पोलीस भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या समोर आले होते. मैदानी आणि लेखी परीक्षेत हे गैरप्रकार झाले होते. या सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर 149 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये बीडमधील 20 जणांचा समावेश असून, इतर 13 जण हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

विशेष म्हणजे, या वर्षी झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करून समांतर आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात देखील गडचिरोली, यवतमाळ, लातूर निळाभाईंदरसह इतर ठिकाणी बीडच्या उमेदवारांवर यापूर्वी ही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातच आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले असून, यातही बीड कनेक्शन समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

बीड जिल्ह्यात रॅकेट सक्रिय? 

वेगवेगळ्या जिल्ह्यात शासकीय सेवत असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात बीड जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील तरुणांमध्ये शासकीय नोकरीचा क्रेझ पाहायला मिळतो. त्यात ग्रामीण भागात नेहमीच दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतात खूप उत्पन्न होत नसल्याने तरुण शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करतात. त्यामुळे स्पर्धा परीक्षा आणि विशेष करून पोलीस भरतीसाठी अनेकजण तयारी करतात. त्यामुळेच याचाच फायदा घेत काहीजण या तरुणांना नोकरी लावण्याची आमिष दाखवून त्यांची फसवणूक करतात. त्यामुळे मागील काही दिवसांत होणाऱ्या अनेक घोटाळ्यात बीड कनेक्शन समोर येत आहे. तर जिल्ह्यात या संबधित रॅकेट सक्रीय आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Mumbai Police Recruitment: मुंबई पोलीस दलात कंत्राटी भरती नाही, ही तर...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात थेट सांगितले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Embed widget