बीडमध्ये मराठा आंदोलकांची पंकजा मुंडेंना काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Pankaja Munde and Maratha Protest : बीड लोकसभेसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली.
Pankaja Munde and Maratha Protest, Beed : बीड लोकसभेसाठी भाजपाकडून पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर मुंडे यांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली आहे. पंकजा मुंडे आज (दि.23) बीड जिल्हा दौऱ्यावरती होत्या. क्षेत्र संस्था नारायण गड येथे त्या दर्शनाला आल्या. त्यानंतर दर्शन घेऊन गेवराईकडे जात असताना बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी येथे मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवले. शिवाय निषेध नोंदवत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील दिल्या. दरम्यान, आचारसंहिता आणि जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे जवळपास दहा मराठा आंदोलकांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा समाज प्रत्येक मतदारसंघात 2 उमेदवार देण्याच्या तयारीत
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधात शड्डूच ठोकला आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी झाली नाही तर प्रत्येक मतदारसंघातून मराठा समाज 2 हजार उमेदवार उभे करणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातही मराठा समाज शेकडो उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाजाने सरकारला घेरण्याची योजनाच आखली आहे.
अनेक नेत्यांच्या गाड्या अडवल्या
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवरुन चांगलाच आक्रमक झाला आहे. गावात प्रचारासाठी आलेल्या काही राजकीय नेत्यांच्या गाड्या मराठा समाजाने अडवण्यास सुरुवात केली आहे. सोलापुरात प्रणिती शिंदे यांची देखील गाडी अडवण्यात आली होती. मात्र, माझी गाडी भाजपच्या गुंडांनी अडवली आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : ठाकरे गटाचे नेते निवडणुकीत आपल्याला मदत करतील, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा दावा