एक्स्प्लोर

Manoj Jarange : तब्येत खालावली, रात्रभर उपचार, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला; तरीही जरांगे सभेवर ठाम

Manoj Jarange : जरांगे यांना ताप आला होता आणि प्रचंड अशक्तपणा देखील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. असे असतांना आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. 

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राचा दौरा करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची सोमवारी बीडच्या (Beed) अंबेजोगाईच्या सभेत प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना अंबेजोगाईच्या थोरात हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना ताप आला होता आणि प्रचंड अशक्तपणा देखील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. असे असतांना आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. 

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे सतत वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करतांना पाहायला मिळत आहे. त्यांच्या अनेक सभा पहाटेपर्यंत चालल्याचे देखील पाहायला मिळाले. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती खालावली आहे. सोमवारी सुरवातीला धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील माकणी-करजगाव येथील सभेत त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांनी बसूनच भाषण केले. पुढे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील सभेत देखील त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी येथे देखील बसूनच भाषण केले. त्यानंतर त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना ताप असून, प्रचंड अशक्तपणा निर्माण झाला असल्याचे म्हटले. तसेच, त्यांनी विश्रांती घेणं महत्वाचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. परंतु, मनोज जरांगे आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे. 

मनोज जरांगेंच्या आजच्या सभा...

मनोज जरांगे कालपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांची अंबेजोगाईमध्ये सभा पार पडली. तसेच, त्यांच्या आजच्या दौऱ्यानुसार केज तालुक्यातील बोरी सावरगावमध्ये दहा वाजता पहिली सभा होईल. त्यानंतर एक वाजता धारूर आणि तीन वाजता माजलगावमध्ये सभा होईल. तसेच, त्यांच्या दौऱ्याचे समारोप माजलगावमधील जाहीर सभेने होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. 

पुढील भूमिका 17 डिसेंबरला जाहीर करणार... 

मराठा आरक्षणाचा मुदा मार्गी लावण्यासाठी सरकारने 24 डिसेंबरपर्यंत वेळ मागितली असून, त्यांना मुदत देण्यात आल्याची माहिती मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आली होती. दरम्यान, मुदत जवळ आली असतांना देखील जरांगे यांच्या अनेक प्रमुख मागण्या अजूनही मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे आता आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी 17 डिसेंबरला आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलवण्यात आली आहे. तर, या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे या बैठकीत मनोज जरांगे यांच्यासह राज्यभरातील मराठा आंदोलक उपस्थित राहणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange : जरांगे पाटील उपचारासाठी रुग्णालयात दाखल, अंबाजोगाईतील भाषणादरम्यान प्रकृती खालावली 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget