एक्स्प्लोर

Makar Sankranti 2023: विधवा महिलांची कुंकवा पलीकडची संक्रांत; बीडमधील अनोख्या उपक्रमाची चर्चा

Makar Sankranti 2023 : मकरसंक्रांतीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये 'मकर संक्रात कुंकवा पलीकडची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

Beed Makar Sankranti 2023: जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांत (Makar Sankranti 2023). या दिवशी एकमेकांना तिळगूळ देऊन वर्षभर गोड बोलण्यास सांगण्यात येतं. मात्र समाजातील काही प्रथांमुळं विशिष्ट वर्गाला मात्र या सणाचा भाग होता येत नाही.   मकरसंक्रांत (Makar Sankrant) म्हटलं सौभाग्याचं लेणं लेऊन साजरा केला जाणारा सण. आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून महिला तीळगूळ वाटून मकरसंक्रांत साजरी करतात.  याच मकरसंक्रांतीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये 'मकर संक्रात कुंकवा पलीकडची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

बीडच्या काकडहिरा गावात विधवा महिलांच्या सन्मानासाठी मकरसंक्रातीचा सोहळा रंगला. प्रतिभा हावळे आणि मनीषा जायभाये या दोघी मैत्रिणी गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या गावात संक्रांतीच्या सणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करतात.. विधवा झाल्यानंतर आपल्याला जी वागणूक मिळाली ती इतर महिलांना मिळू नये म्हणून या दोघींनी या उपक्रमाची सुरुवात केली. 

कार्यक्रमात शंभरच्या वर विधवा महिलांना साडीचोळीचं वाटप 

या कार्यक्रमात शंभरच्या वर विधवा महिलांना साडीचोळीचं वाटप करण्यात आलं. आपल्या पतीच्या निधनानंतर अनेक महिलांनी संक्रांतीचा सण साजरा केला नव्हता. आज मात्र या ठिकाणी या महिलांचा जो सन्मान झाला तो पाहून या महिला भारावून गेल्या होत्या आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचा गोडवा निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.  

नवीन वर्ष सुरु झालं की मकर संक्रांतीचा पहिलाच सण असल्याने मोठ्या उत्साहात ही संक्रात साजरी होते. अनेक महिला हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने जवळच्या मैत्रिणींना आणि सुवासिनींना वाण देण्यासाठी आमंत्रण देतात. अशा कार्यक्रमात मात्र विधवा महिलांना कुठेही आमंत्रण दिल जात नाही. आता मात्र या उपक्रमाच्या माध्यमातून या महिला आनंदात आपली संक्रात साजरी करणार आहेत.

मकर संक्रांतीला अनेक सामाजिक उपक्रम तसेच सण अगदी आनंदात आणि उत्साहाने साजरे केले जातात. सामाजिक सण जसे की रंगीबेरंगी सजावट, ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे, गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे, मेळे, नृत्य, पतंग उडवणे, बोनफायर आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते. 

कुणाला अपघाताने तर कुणाला नशिबाने अकाली विधवापण येते म्हणून त्यांना कायम दुय्यम वागणूक दिली जाते. म्हणूनच कुकंवा पलीकडची ही संक्रांत आपल्या समाजा समोरचा मोठा आदर्श म्हटला पाहिजे. 

ही बातमी देखील वाचा

Kolhapur : विषय गंभीर तिथं कोल्हापूर 'खंबीर' ! जिल्ह्यातील 1025 पैकी 569 गावांत विधवा प्रथेला मुठमाती देण्यासाठी ठराव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget