ST Mahamandal: एसटी महामंडळाच्या 'त्या' निर्णयावरून धनंजय मुंडे आक्रमक; ट्वीट करत म्हणाले...
Beed News : संप काळात कामावर घेतलेल्या 800 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकराने कामावरून काढू नयेत: धनंजय मुंडे
Aurangabad News: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या वेळी एसटी महामंडळाने ( ST Mahamandal ) करार पद्धतीने 800 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मात्र आता ते करार संपवले आहे. त्यामुळे आता आवश्यकता संपल्याने पुन्हा करार केला जाणार नसल्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे या 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. दरम्यान या 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नयेत अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
याबाबत धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू रहावी यासाठी बाह्य संस्थेमार्फत 800 कंत्राटी चालक नेमले होते. मात्र आता त्या सर्वांना काढून टाकण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व कंत्राटी चालकांना राज्य शासनाने सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरू रहावी यासाठी बाह्य संस्थेमार्फत 800 कंत्राटी चालक नेमले होते,मात्र आता त्या सर्वांना आता काढून टाकण्यात येत आहे. ज्या लोकांनी एसटी बंद होऊ नये म्हणून दिवसरात्र काम केले आता त्यांना वाऱ्यावर सोडणं योग्य नाही. (1/2) pic.twitter.com/9ngJ1OcXyZ
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 5, 2022
अन्यथा या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात 800 खाजगी चालकांना एसटी महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत कंत्राटी नेमणूक करून राज्यातील विविध जिल्ह्यात एसटी चालू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्या सर्व 800 लोकांनी आजतागायत दिवस रात्र सेवा दिली. मात्र त्या सर्वांची सेवा आता बंद करा, अशा स्वरूपाचे आदेश एसटी महामंडळाने आज पारित केले आहेत. ज्या लोकांनी एसटी बंद होऊ नये म्हणून दिवसरात्र काम केले आता त्यांना वाऱ्यावर सोडणं योग्य नाही. अचानक रोजगार गेल्याने त्यांच्या व त्यांच्या कुटुंबांवर आता उपासमारीची वेळ येऊ शकते, असं मुंडे म्हटले आहे. तर याबाबत काही कंत्राटी चालकांनी धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडे निवेदन देखील दिले आहे.
कठीण काळात सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना आता वाऱ्यावर सोडून देणे योग्य नसून त्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने नियमित सेवेत सामावून घ्यावे, अशी विनंती धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्विटद्वारे केली आहे.
महत्वाच्या बातम्या...
Rain Update : शेतकऱ्यांना दिलासा! महिनाभराच्या विश्रांतीनंतर राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस