एक्स्प्लोर

Vinayak Mete: शाळेत शिक्षकांविरोधात आंदोलन ते मराठा आंदोलनाचा नेता, विनायक मेटेंचे हे किस्से नक्की वाचा

Vinayak Mete News: मेटेंनी निषेध म्हणून मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या निषेधाचे फलक गावभर लावले होते.

Vinayak Mete: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांचं अपघाती निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुळात बुडाला आहे. तर महाराष्ट्रातील राजकारणात आपलं वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या विनायक मेटेंची एक आक्रमक नेता म्हणून वेगळी ओळख होती. पण मुळात मेटे हे लहानपणापासूनच आक्रमक होते. शाळेत असतानाच त्यांनी आंदोलनाचं अस्त्र उगारत आपल्यावरील अन्यायाविरोधात आवाज उठवल्याची आठवण आजही त्यांचे वर्गमित्र करून देतात. 

मुख्याध्यापकाचे गावभर निषेधाचे फलक लावले...

विनायक मेटे हे लहानपणापासूनच आक्रमक होते. चौथीमध्ये असताना बीडच्या राजेगावातल्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी वार्षिक क्रीडा स्पर्धा रद्द केल्या होत्या. त्यामुळे मेटेंनी त्याचा निषेध म्हणून मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या निषेधाचे फलक गावभर लावले होते. पुढे गावात सहावीनंतर वर्ग नसल्याने सातवीच्या शाळेसाठी मेटे कळंबला आले. पण जिथे खायला पैसे नाहीत, तिथे शाळा कुठली आली. त्यामुळे त्यांचे एक वर्ष शाळेविना वाया गेलं. पण पुढे शेतात काम करुन पैसे कमवून मेटेंनी नववीला परस्पर प्रवेश घेतला. रोज पाच किलोमीटरची पायपीट करून शिक्षण घेतले. 

मेटेंच्या आंदोलनाने शिक्षण विभाग खडबडून जागं झालं...

सातवीसाठी गावात शाळा नसल्याने मेटे पुढच्या शिक्षणासाठी कळंबला आले. पण कळंबच्या शाळेतही मेटेंना त्यांच्यातला क्रांतिकारी गप्प बसू देत नव्हता. शाळेत एकाही महापुरुषांची जयंती साजरी होत नव्हती. त्यामुळे ननवीत असलेल्या मेटेंनी विद्यार्थ्यांची एकजूट करुन शाळेवरच बहिष्कार टाकला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाने खळबळ माजली होती. अखेर शिक्षणाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि शाळेत महापुरुषांच्या जयंत्या सुरु झाल्या.

मेटेंना मुंबई खुणावू लागली...

मेटे यांच्यासाठी दहावीचा वर्षे महत्वाचा होता. शेतात कष्ट करून आणि रोज पाच किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी तीन वर्षे काढले होते. त्यामुळे त्यांनी अफाट कष्ट करत अखेर दहावी 52 टक्क्यांनी पास केली. विशेष म्हणजे त्यावर्षी दहावीला गावातून मेटेंसह फक्त दोघेच पास झाले होते. पुढे त्यांनी केएसके महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात असताना ते विद्यार्थी चळवळीत सामील झाले आणि तेथूनच मेटेंना मुंबई खुणावू लागली होती. त्यानंतर ते मुंबईत आले आणि पुढे समाजासाठी केलेल्या कामातून त्यांची मराठा आंदोलनाचा नेता म्हणून महाराष्ट्राला ओळख झाली. 

महत्वाच्या बातम्या...

Vinayak Mete: आम्ही जाऊ नका म्हणत होतो तरी गेले आणि होत्याचं नव्हतं झालं; मेटेंच्या घरच्यांची प्रतिक्रिया

Vinayak Mete : विनायक मेटेंचा अपघात नेमका झाला कसा? पोलिसांचा अहवाल एबीपी माझाच्या हाती; जाणून घ्या घटनाक्रम

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
‘दादा आणि शिंदे गट अमित शहा कधीही संपवू शकतात’; संजय राऊतांच्या वक्तव्यावर सरनाईकांचा पलटवार, म्हणाले, राऊतांचाच एक गट, मी त्यांच्याच गटाचा सदस्य होतो
‘दादा आणि शिंदे गट अमित शहा कधीही संपवू शकतात’; संजय राऊतांच्या वक्तव्यावर सरनाईकांचा पलटवार, म्हणाले, राऊतांचाच एक गट, मी त्यांच्याच गटाचा सदस्य होतो
Beed News: खबरदार! बोरवेलचे अनाधिकृत खोदकाम केल्यास थेट गुन्हा दाखल होणार; बीड जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; जिल्ह्यात बोरवेल खोदकामावर निर्बंध
खबरदार! बोरवेलचे अनाधिकृत खोदकाम केल्यास थेट गुन्हा दाखल होणार; बीड जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय; जिल्ह्यात बोरवेल खोदकामावर निर्बंध
Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा लपंडाव! विदर्भ-मराठवाड्यासह राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?
महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा लपंडाव! विदर्भ-मराठवाड्यासह राज्यातील 'या' जिल्ह्यांना अलर्ट; हवामान विभागाचा अंदाज काय?

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Embed widget