Beed: नुकसानभरपाईच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन
Beed News: पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Beed News: बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या नित्रुड मंडळामध्ये अतिवृष्टी (Heavy Rain) झाल्याने शेतकऱ्यांच्या शेत पिकाच मोठ नुकसान झाल आहे. तर अनेक शेतात पाणी शिरल्याने सोयाबीनच्या गंजी वाहून गेल्या आहेत. तर कापसाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी व 25% आगरी विम्याची रक्कम अदा करावी यासाठी किसान सभेने जलसमाधी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बीड जिल्ह्यात (Beed District) अतिवृष्टीच्या पावसाने सोयाबीन कापूस व इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे नको नुकसान भरपाई द्या आशा घोषणाबाजी करत माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नित्रूड तलावात जलसमाधी आंदोलन केले. याप्रसंगी विमा कंपनी आणि शासनाचा निषेध करत जोरदार घोषणाबाज करून परिसर दणाणून सोडला. प्रसंगी किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी माजलगावचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. तर नित्रूड महसूल मंडळातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश तलाठी, मंडळधिकाऱ्याना दिले असून, नित्रूड महसूल मंडळातील शेतकऱ्यांना विमा कंपनीने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रीम रक्कम जमा करावे असे सूचना तहसीलदार यांनी कंपनीला दिले आहेत.
तलावाच्या काठावर बसून भजन
परतिच्या पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीन कापूस व इत्यादी पिकांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 25 हजार मदत द्या,पीक विमा 25% अग्रीम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा इत्यादी मागण्यां आंदोलनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आले. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते. तर काही शेतकऱ्यांनी तलावाच्या काठावर बसून सरकारचा निषेध करण्यासाठी भजन गायलं आणि मदतीची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान...
पावसाळा सुरु होताच झालेल्या अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातच आता परतीच्या पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असल्याने शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे. ज्यात खरीप पीकं पूर्णपणे हातून गेली आहे. त्यामुळे पंचनामे न करता सरकराने सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतांना पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या...
Beed Rain : बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा कहर, शेतीपिकांचं मोठं नुकसान