Beed Crime News: बीड जिल्हा हादरला! घरकुलाच्या आमिषाने दोघांचा वृद्धेवर अत्याचार
Beed Crime News: घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन, त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
![Beed Crime News: बीड जिल्हा हादरला! घरकुलाच्या आमिषाने दोघांचा वृद्धेवर अत्याचार maharashtra News Aurangabad News Both of them abused the old woman with the lure of the house A case has been filed with the police Beed Crime News: बीड जिल्हा हादरला! घरकुलाच्या आमिषाने दोघांचा वृद्धेवर अत्याचार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/15/da0823ef3909246c0671e270758255ff1673786146444443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Beed Crime News: बीड जिल्ह्यात (Beed District) एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. घरकुल व निराधार योजनेतून मानधन सुरु करतो, असे आमिष दाखवून येथील तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनासह अन्य एकाने वृध्देवर बलात्कार (Rape) केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन, त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. शंकर कोपूरवाड व राजू उजगरे अशी आरोपींची नावे आहेत. 'लोकमत'ने याबाबत वृत्त दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित 68 वर्षीय महिला बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रहिवासी असून मुंबईला राहते. दरम्यान शेतीचा वाद सुरु असल्याने त्या दरमहा वडवणी तहसील कार्यालयात येतात. दरम्यान याच काळात त्यांची त्यांची ओळख राजू उजगरेशी झाली. पुढे त्याने महिलेची तहसील कार्यालयातील अव्वल कारकून शंकर कोपूरवाडशी ओळख करुन दिली.
दरम्यान पीडीत महिलेला निराधार योजनेतून मानधन सुरु करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी त्या 9 जानेवारीला वडवणीला आल्या होत्या. तर प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगून दोघांनी दुचाकीवरून त्यांना चिंचवणला नेले. मात्र वडवणीला परत येतांना दुचाकी बिचकुलदरा तांड्याकडे वळवली. यावेळी शंकर कोपूरवाड व राजू उजगरे या दोघांनी वृद्ध महिलेवर आळीपाळीने अत्याचार केला.
दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पीडीत महिलेवर ओळखीच्या दोघांनी अत्याचार केल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी वडवणी ठाणे गाठून पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. घटनेची गंभीरता लक्षात घेत, पोलिसांनी महिलेची तक्रार घेऊन तत्काळ गुन्हा दाखल केला. तसेच गुन्हा दाखल होताच आरोपींचा शोध घेण्यासाठी पथकाला रवाना करण्यात आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी
ओळखीच्या दोघांनी वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा 12 जानेवारी रोजी वडवणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर गुन्हा दाखल होताच वडवणी ठाण्याचे सहायक निरीक्षक आनंद कांगुणे यांनी आरोपीच्या शोध सुरु केला. दरम्यान पोलिसांच्या पथकाने 13 जानेवारीला पहाटे दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तसेच न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांना गावकऱ्यांनी लावलं पळवून, बीडमधील घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)