एक्स्प्लोर

Beed Crime News : धक्कादायक! शेतातून गेल्याचा राग आला; शाळकरी मुलाची हत्या करुन मृतदेह टांगले झाडाला

Beed Crime : पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून, त्याला बेदम मारहाण करून आधी त्याची हत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली.

Beed Crime News : बीडच्या (Beed) माजलगाव तालुक्यातील नित्रुड परिसरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. अवघ्या पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा शेतातून गेला म्हणून, त्याला बेदम मारहाण करून आधी त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह एका झाडाला टांगण्यात आला. ही घटना नित्रुड परिसरात मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाम मोहम्मद मुर्तुजा शेख ( वय 15 वर्षे, रा.नित्रुड, ता. माजलगाव बीड) असं मृत मुलाचं नाव आहे. तर कैलास डाके, महादेव डाके, हनुमंत वानखेडे असे आरोपींचे नावं आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील 15 वर्षीय गुलाम मोहम्मद इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. दरम्यान मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास गुलाम मोहम्मद हा लहान बहीण सिमरन व छोटा भाऊ हुजैफा यांना घेऊन आजोबांच्या शेतात सरपण आणण्यासाठी गेला होता. दरम्यान याचवेळी कैलास डाके, महादेव डाके आणि हनुमंत वानखेडे या तिघांनी गुलाम मोहम्मदला रस्त्यात अडवलं. तसेच आमच्या शेतातून का जातोस असे म्हणत गुलाम याला बेदम मारहाण केली. एवढच नाही तर जमिनीवर पाडून  मारहाण केली. 

आमच्या शेतातून का जातो म्हणून गुलामला तिघांनी बेदम मारहाण केल्यानंतर, सरपणासाठी नेलेल्या ओढणीने तिघांनी गुलामचा गळा आवळला. त्यामुळे घाबरलेल्या गुलामची बहीण सिमरन आणि भाऊ हुजैफा  यांनी पळ काढत घर गाठलं. तसेच घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे घरच्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी पालखी महामार्गावरील नित्रुडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात एका लिंबाच्या झाडाला गुलामचा मृतदेह लटकावलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान याची माहिती मिळताच, दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

पोलीस स्टेशन बाहेर मृताचे नातेवाईकांनी गर्दी!

मोहम्मद गुलामला बेदम मारहाण करून त्याचा मृतदेह एका झाडाला लटकवण्यात आल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे माहिती मिळताच मोहम्मद गुलाम याच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुलाम याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

भर रस्त्यात पाठलाग करुन सराईत गुन्हेगाराची हत्या; हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Embed widget