भर रस्त्यात पाठलाग करुन सराईत गुन्हेगाराची हत्या; हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरू
Sangli Crime News: सांगलीच्या बामणोलीमध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या. हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट. कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
Sangli Crime News: भर रस्त्यात पाठलाग करून खून करण्याची दुसरी घटना सांगली (Sangli News) जिल्ह्यात (Sangli District) घडली आहे. सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करत सांगलीच्या कुपवाड (Kupwad) जवळच्या बामणोली (Bamnoli) येथे निर्घृण खून करण्यात आला आहे. अमर उर्फ गुट्ट्या जाधव असं मृत गुन्हेगाराचं नाव आहे. मात्र हा खून कोणत्या कारणातून झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. रात्री दहाच्या सुमाराला ही घटना घडली.
मृत अमर जाधव (Amar Jadhav) हा आपल्या दुचाकीवरून कुपवाड नजीक असणाऱ्या बामणोली येथील आपल्या घरी निघाला होता. दुचाकीवरून हल्लेखोर आले, आणि काही कळायच्या आत त्याच्यावर कोयत्यानं वार सुरू केले. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी अनेक पथकं तयार केली आहेत.
रात्री दहाच्या सुमारास हा खुनाचा थरार घडला आहे. मृत अमर जाधव हा आपल्या दुचाकीवरून कुपवाड नजीक असणाऱ्या बामनोली येथील आपल्या घरी निघाला होता. दुचाकीवरून हल्लेखारांनी पाठलाग केला. त्याला रस्त्यावर अडवून काही कळायच्या आतच त्याच्यावर धारदार शस्त्रांनी एकामागून एक सपासप वार केले. ज्यामध्ये अमर जाधव गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्त्रावर झाला. तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच, घटनास्थळाचा पंचनामा केला.
पोलीस सध्या या घटनेचा कसून तपास करत आहेत. पोलिसांनी हल्लेखोराच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. मृत अमर जाधव उर्फ गुट्ट्या विरोधात कुपवाड पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गुन्हेगारीतून किंवा पूर्ववैमनस्यातून अमर जाधवची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र खुनाच्या घटनेमुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, सांगली शहरामध्ये गेल्या आठ दिवसांत तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आधीपासूनच भीतीनं भेदरलेल्या नागरिकांच्या मनातील भीती आणखी वाढली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :