(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्रीक्षेत्र संस्था नारायण गडावर मनोज जरांगेंच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा; शेतकऱ्यांसाठी घातलं साकडं
Ashadhi Ekadashi Manoj Jarange: मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटांनी ही पूजा करण्यात आली.
Ashadhi Ekadashi Manoj Jarange बीड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या हस्ते श्रीक्षेत्र संस्था नारायण गडावरती विठ्ठल रुक्मिणीची व नगद नारायण महाराजांची महापूजा पार पडली. यावेळी गडाचे महंत शिवाजी महाराज देखील उपस्थित होते.
प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे धाकटी पंढरी श्रीक्षेत्र संस्थान नारायण गड येथील विठ्ठल रुक्मिणी व संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांच्या पूजेचा मान मनोज जरांगे पाटील यांना होता. त्यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी गडाचे महंत शिवाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये महापूजा करण्यात आली. मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटांनी ही पूजा करण्यात आली.
मनोज जरांगे काय म्हणाले?
पूजा संपन्न झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील शेतकरी सुखी व्हावा राज्यांमध्ये भरपूर पाऊस पडावा व सर्व शेतकऱ्यांना सुखी ठेवावं, असं विठ्ठलाकडे साकडं घातल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरात शासकीय महापूज संपन्न
आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (CM Eknath Shinde) हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा (Vitthal Rukmini Mahapooja) करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक ही शासकीय महापूजा पार पाडली. यंदा आषाढी सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत आषाढी एकाशीच शासकीय महापूजा (Ashadhi Ekadashi Shasakiya Mahapooja) नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील अहिरे कुटुंबानं केली. नाशिक जिल्ह्यातील अहिरे कुटुंब 16 वर्ष नित्यनियमानं पंढरीची वारी (Pandharpur Vari) करतंय. बाळू शंकर अहिरे आणि त्यांच्या पत्नी आशाबाई बाळू अहिरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत मनोभावे आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली.
भक्तांमध्ये भेद नाही! आषाढीला व्हीआयपी दर्शन बंदच-
मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्यावेळी होणारी व्हीआयपी गर्दी (Pandharpur Ashadhi Wari 2024) टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले . वास्तविक मंदिराचा गाभारा, सोळखांबी लहान असल्याने जास्त व्हीआयपी आत आले तर मुख्यमंत्र्यांसह महत्वाच्या व्यक्तींना अनावश्यक गर्दीला सामोरे जावे लागते यामुळे मंदिर समितीशी ठरवून महापुजेला मर्यादित व्हीआयपींना प्रवेश देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी Abp माझाशी बोलताना सांगितले . याशिवाय महापूजा सुरु असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीतकमी वेळेत करण्यासाठी मंदिर समितीशी चर्चा केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.