एक्स्प्लोर

Walmik Karad : वाल्मिक कराड हाच जेलच्या मारहाणीचा आका, सीसीटीव्ही तपासा; महादेव गित्तेचे कारागृह अधीक्षकांना पत्र

Santosh Deshmukh Murder Case : कारागृहात हाणामारी झाल्याच्या घटनेनंतर महादेव गित्ते आणि त्याच्या सहकाऱ्यांना दुसऱ्या कारागृहात हलवण्यात आलं होतं. 

बीड : वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन आपल्याला बीड कारागृहात मारहाण झाल्याचा आरोप आता महादेव गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी केला आहे. या प्रकरणी कारागृहाचे सीसीटीव्ही तपासण्यात यावेत आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तशा आशयाचं पत्र महादेव गित्ते आणि राजेश वाघमोडे यांनी बीड कारागृहाच्या अधीक्षकांना लिहिले आहे. 

परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्येचे आरोपी असलेले बबन गित्तेचे सहकारी आधीपासूनच बीडच्या जिल्हा कारागृहात होते. त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले वाल्मिक कराड आणि त्याचे सहकारी देखील याच कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले. मात्र काही दिवसातच वाल्मिक कराडचे सहकारी असलेले सुदर्शन घुले आणि बबन गित्तेचे याचे सहकारी महादेव गित्ते यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली. त्यानंतर महादेव गित्ते आणि त्याच्या सहकाऱ्यांना इतरत्र जेलमधे हलवण्यात आले. मात्र आता आपल्यालाच मारहाण झाल्याचे पत्र कारागृह प्रशासनाला देत महादेव गित्ते याने सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा दावा

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याची तक्रार देखील सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीयांकडून करण्यात आली होती. इतकंच नाही तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील या व्हीआयपी ट्रीटमेंट बाबत माध्यमांसमोर वक्तव्यं केली होती. तसेच कारागृहातील सीसीटीव्ही बंद असल्याचे देखील यावेळी समोर आले होते. त्यानंतर पुन्हा बीड जिल्हा कारागृहात हाणामारीचा प्रकार झाल्यानंतर कारागृहाचा आका देखील वाल्मिक कराडच असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

31 मार्च रोजी फोन लावण्यासाठी बराक मधून आरोपींना बाहेर काढले गेले होते. यावेळी वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते या दोघांत शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली होती. परंतु कारागृह प्रशासनाने कराडचा काहीच संबंध नसल्याचे सांगत राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणे यांच्यात वाद झाल्याचा दावा करत गुन्हा दाखल केला. 

कारागृहात हाणामारी झाल्याचं सिद्ध?

त्यानंतर गित्ते आणि आठवले गँगच्या  सदस्यांना इतरत्र जेलमध्ये हलवण्यात आले. मात्र वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहात आम्हाला मारहाण केल्याची तक्रार महादेव गित्ते, राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महादेव गित्ते यांनी कारागृह अधीक्षकांकडे केल्याने कारागृहात गित्ते आणि कराड गँगमध्ये राडा झाला होता हे सिद्ध झाले असेच म्हणावे लागेल.

महादेव गित्तेच्या पत्नीचा वाल्मिक कराडवर आरोप

तू सध्या जेलमध्ये आहेस म्हणून वाचलास नाहीतर तुझे हाल संतोष देशमुख याच्यापेक्षा वाईट करून तुम्हाला मारलं असत अशी धमकी महादेव गित्तेला जेलमध्ये दिल्याची माहिती त्याची पत्नी मीरा गित्ते हिने दिली. वाल्मिक कराडला जेलमध्ये ज्या सुविधा मिळत आहेत त्याला गित्ते विरोध करत होता. म्हणूनच हा मारहाणीचा प्रकार झाला आहे. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदीप सोनवणे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, रघुनाथ फड,बालाजी दहिफळे, हैदर अली,लईक अली, योगेश मुंडे, जगन्नाथ फड आणि त्याच्या साथीदारांनी आपल्यावर हल्ला केला असल्याचे महादेव गित्ते याने आपल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत बीडच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असून जेलमधील मारहाणीच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार असल्याचे गित्तेच्या पत्नीने सांगितले आहे.

वाल्मिक कराडची बीड जिल्ह्यात दहशत होती. याबाबतच्या अनेक घडामोडी गेल्या तीन महिन्यात समोर आल्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच आका आहे असे भाजपचे आमदार सुरेश धस वारंवार सांगत आले आहेत. त्यातच बीडमध्ये विविध गँगच्या वर्चस्वाच्या लढाया आधी कारागृहाच्या बाहेर सुरू होत्या. आता कारागृहामध्ये झालेल्या मारहाणीच्या या प्रकरणानंतर ही वर्चस्वाची लढाई आता कारागृहात देखील सुरू असल्याचे दिसून येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
राष्ट्रीय संघातील खेळाडूने पुण्यात आयुष्य संपवलं, बीडमधील राष्ट्रीय खो-खो खेळाडू तुषार करांडेचं टोकाचं पाऊल
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टं तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
लाचेसाठी पार 'लाज' सोडली! कैद्याकडून 40 हजार घेत महिला पोलिस अधिकाऱ्याचा खाकी वर्दीतच चक्क नग्न काॅल; बेळगावात सेवा बजावलेल्या आणि सध्या बंगळुरात असलेल्या महिला अधिकाऱ्याचा कारनामा
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
भाजप झेन-जी विरोध, खेळाची मैदानं घेत आहे; मुंबईतील नेव्हिल ग्राऊंडवरुन आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Embed widget