एक्स्प्लोर

Beed Jail Gang War: महादेव गित्तेंना जेलमध्ये वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन का मारलं? गित्तेच्या पत्नीनं सांगितलं खळबळजनक कारण

beed crime news: महादेव गित्ते याने जेल प्रशासनाला दिलेल्या तक्रारीनंतर त्याची पत्नी मीरा गित्ते यांचे वाल्मीक कराड गँगवर आरोप. कारागृहातील मारहाणीची प्लॅनिंग तीन दिवस आधीच झाल्याचा आरोप

Beed Crime:  महादेव गित्ते याने जिल्हा कारागृहाच्या प्रशासनाला दिलेल्या तक्रारीनंतर त्यांची पत्नी मीरा गित्ते यांनी वाल्मीक कराड यांच्यासह गँगवर गंभीर आरोप केले आहेत. महादेव गित्ते यांनी बीड कारागृहात (Beed Jail) झालेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज तक्रारीत मागितले आहेत. ते प्रशासनाने द्यायलाच पाहिजेत, याला वेळ का लागत आहे, असा सवाल मीरा गित्ते (Mira Gitte) यांनी उपस्थित केला. कारागृहातील मारहाणीची प्लॅनिंग तीन दिवस आधीच केली गेली होती. एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून महादेव गित्ते (Mahadev Gitte) यांच्यावर दहा जणांनी हल्ला केला, असे मीरा गित्ते यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

मीरा गित्ते यांच्या दाव्यानुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि परळीतून जेलमध्ये गेलेले आरोपींनी महादेव गित्ते यांना  मारहाण केली होती. यावेळी तुम्ही सध्या जेलममध्ये आहेत म्हणून वाचलात नाहीतर, तुमचे हाल संतोष देशमुख यांच्यापेक्षा वाईट करून तुम्हाला मारलं असतं, अशी धमकी  महादेव गित्तेच्या  यांना देण्यात आली, असा दावा त्यांच्या पत्नीने केला.

वाल्मीक कराड याला जेलमध्ये ज्या सुविधा मिळत आहेत त्याला गित्ते विरोध करत होते, म्हणूनच हा मारहाणीचा प्रकार झाला आहे.
बापू आंधळे खून प्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव 302 मध्ये घेतले पाहिजे. या प्रकरणातील सर्व आरोपींच्या गुन्ह्याची तपासणी केली पाहिजे. मी आज बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असून जेलमधील मारहाणीच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार आहे, अशी माहिती मीरा गित्ते यांनी दिली.

कारागृहातील भांडणाचा मास्टरमाईंड वाल्मीक कराडच: मीरा गित्ते

वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याच्या साथीदारांनी कारागृहात आम्हाला मारहाण केल्याची तक्रार महादेव गित्ते, राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महादेव गित्ते यांनी कारागृह अधीक्षकांकडे केली आहे. 

31 मार्चला सकाळी मी आणि माझे सहकारी तुरुंगातील बराकीतून बाहेर पडलो. त्यावेळी वाल्मीक कराडच्या सांगण्यावरुन आमच्यावर हल्ला झाला. सुदीप सोनवणे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, रघुनाथ फड, बालाजी दहिफळे, हैदर अली,लईक अली,योगेश मुंडे,जगन्नाथ फड व त्याच्या साथीदारांनी आमच्यावर हल्ला केला.  ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्यामुळे हे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे, अशी मागणी महादेव गित्ते यांनी केली.

आणखी वाचा

Beed Crime Walmik Karad: आम्ही बराकीतून बाहेर पडलो अन् वाल्मीक कराडच्या.... महादेव गित्तेची नवी थिअरी, सीसीटीव्ही ठरणार महत्त्वाचा पुरावा

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

Embed widget