(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MP Bajrang Sonwane : जय शिवराय, जय किसान, जय महाराष्ट्र, पंकजा मुंडेंचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणेंनी घेतली मराठीत शपथ
बीड लोकसभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonwane) यांनी देखील मराठीतच लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली.
MP Bajrang Sonwane : लोकसभेत निवडूण (Loksabha Election) आलेल्या नवनियुक्त खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील बऱ्यापैकी खासदारांनी मराठीतच शपथ घेतली. यावेळी बीड लोकसभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonwane) यांनी देखील मराठीतच लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली.
दरम्यान, शपथ घेताना बजरंग सानवणे यांनी जय शिवराय, जय किसान, जय महाराष्ट्र असे म्हणाले. दरम्यान, बीड लोकसभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण भाजप नेत्या पंकजा मुंडे निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे निवडणूक लढवत होते. अखेर यामध्ये बजरंग सानवणे यांनी बाजी मारली आहे.
बजरंग सोनवणेंनी 7 हजार मतांनी केला पंकजा मुंडेंचा पराभव
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 7 हजार मतांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला आहे.. त्यामुळे हायहोल्टेज लढतीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा फॅक्टर महत्वाचा मानला गेला. बीड लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वांत तापलेला पाहायला मिळाला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळे मराठवाड्यातील अनेक जागांवर भाजपला पराभव स्वीकारावा लागल्याच्या चर्चा आहेत. बीडमध्ये लोकसभा निवडणूकीत सर्वांत मोठा परिणाम झाल्याचे बोलले गेले. ओबीसी विरुद्ध मराठा वादाने या मतदारसंघात जोर धरला होता.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
बीड लोकसभा मतदारसंघात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पंकजा मुंडे यांच्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांनी जाहीर सभा घेतल्या होत्या. बड्या केंद्रीय नेत्यांनी देखील पंकजा मुंडे यांच्यासाठी सभा घेतल्या होत्या. तसेच मतदारसंघात महायुतीचं प्राबल्य असल्यामुळं पंकजा मुंडे यांचाच विजय निश्चित मानला जात होता. मात्र, मात्र, बीड लोकसभा मतदारसंघातील जनतेनं मतांचं दाण बरजंग सोनवणे यांच्या पारड्यात टाकलं आहे. बजरंग सोनवणे यांच्यासाठी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. शरद पवार यांनी देखील या मतदारसंघात जाहीर सभा घेतली होती. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्याचा देखील सोनवणे यांना फायदा झाला असल्याचे बोलले जात आहे. शेवटपर्यंत अत्यंत अटीतटीच्या लढतीत अखेर सोनवणे यांनी बाजी मारली आहे. दरम्यान, या निवडणुकीनंतर काही दिवस बीड जिल्ह्यात तणावाचे वातावरण तयार झाले होते.
महत्वाच्या बातम्या: