Dhananjay Munde Accident : धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, छातीला मार; पुढील उपचारासाठी मुंबईला हलवणार
Dhananjay Munde Accident : परळीकडे (Beed News) जात असताना धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात. छातीला किरकोळ मार लागल्याची धनंजय मुंडेंची माहिती.
NCP MLA Dhananjay Munde Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. परळीकडे (Beed News) जात असताना धनंजय मुंडे यांच्या गाडीला अपघात (Accident News) झाल्याची माहिती स्वतः धनंजय मुंडे (Dhananjay Munde News) यांनी फेसबुक पोस्टद्वारे (Facebook Post) दिली आहे. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं अपघात झाल्याचं फेसबुक पोस्टमधून धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. या अपघातात छातीला किरकोळ मार लागल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमधून दिली आहे. एबीपी माझाला (ABP Majha) मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे ((Dhananjay Munde Accident News) यांना पुढील उपचारासाठी मुंबईला (Mumbai News) हलवलं जाणार आहे.
एबीपी माझाला मिळालेल्या माहितीनुसार, "धनंजय मुंडे यांचा छोटासा अपघात झाला, त्यामध्ये त्यांना छातीला दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवलं जाणार आहे. दुपारी दोन वाजता लातूर येथून विमानानं धनंजय मुंडे हे मुंबईकडे उपचारासाठी रवाना होतील. धनंजय मुंडे यांच्या बरगड्यांना दोन ठिकाणी मार लागला असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल केलं जाणार आहे."
धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत अपघातासंदर्भात माहिती दिली. फेसबुक पोस्टमध्ये धनंजय मुंडे यांनी लिहिलंय की, "मंगळवारी दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रम आणि भेटी आटपून परळीकडे परतताना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास परळी शहरात माझ्या वाहनचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने छोटासा अपघात झाला आहे. माझ्या छातीला किरकोळ मार लागला असून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. काळजी करण्यासारखे काही नाही, कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये."
माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मतदारसंघातील कार्यक्रम आटोपून रात्री परळीकडे परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यामुळे छोटासा अपघात झाला. यामध्ये धनंजय मुंडेंना छातीला मार लागला आहे. तसेच, किरकोळ दुखापत झाली असून डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती धनंजय मुंडेंनी सोशल मीडियावरुन दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :