Dhananjay Deshmukh: ..आता माझाही बांध फुटलाय, संतोष देशमुख प्रकरणी 60 दिवसांनंतर धनंजय देशमुख म्हणाले, 'आता माझा भाऊ ..
Dhananjay Deshmukh: मी याप्रकरणी फार संयमी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला .मात्र आता दोन महिने झालेत ,माझा भाऊ आता परत येणार आहे का ? असा सवाल धनंजय देशमुखांनी केला.

Dhananjay Deshmukh:मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज 60 दिवस पूर्ण होत आहेत .गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे .बीड मधील दिवसाढवळ्या झालेली हत्या त्यानंतर खंडणी प्रकरण , राखेतून जन्माला आलेली धाकदपटशाही ,बंदुकीचा सर्रास वापर आणि अनेक धक्कादायक खुलाशांनी अनागोंदी माजणे म्हणजे काय याची जाणीव राज्याला होत आहे. अजूनही या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale )फरार आहे .या घटनेने कायदा सुव्यवस्थासह राजकीय घडामोडींना वेग आला आहे .दरम्यान ,मी आत्तापर्यंत शांत होतो पण आता माझाही बांध फुटला आहे .मी या प्रकरणात फार संयमी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला .मात्र आता दोन महिने झालेत माझा भाऊ आता परत येणार आहे का ?असा प्रश्न विचारत धनंजय देशमुख यांनी आता तरी कृष्णा आंधळेला अटक होणार आहे का ?असा सवाल त्यांनी केलाय .(Dhananjay Deshmukh)
9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. 10 डिसेंबर रोजी यातील दोषी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम करण्यात आला. त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक केली. त्यांनतर बीडसह राज्यभर या प्रकरणावरून प्रकरण चांगलेच तापले आहे. आता या घटनेला 60 दिवस पूर्ण होत असून अद्याप फरार असणाऱ्या कृष्णा आंधळेला कधी अटक होणार असा सवाल सर्व स्तरातून होत आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख ?
मी आत्तापर्यंत शांत होतो पण आता माझाही बांध फुटला आहे .मी याप्रकरणी फार संयमी भूमिका घेण्याचा प्रयत्न केला .मात्र आता दोन महिने झालेत ,माझा भाऊ आता परत येणार आहे का ?असा प्रश्न विचारत धनंजय देशमुख यांनी कृष्णा आंधळे ला कधी अटक होणार असा सवाल केलाय .सुरुवातीपासून मी आरोपींच्या मोबाईलची चौकशी करा अशी मागणी करत होतो .अगदी घटना घडल्यानंतर 13 ते 14 तारखेपर्यंत हे आरोपीचे मोबाईल प्रकरण चालू होते .त्यावेळी केवळ आमचे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते .हे आंदोलन मिटवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते .त्या काळात जर या आरोपींच्या मोबाईलचा तपास झाला असता तर कदाचित हे सगळे आरोपी आधीच यांच्या ताब्यात आले असते असं धनंजय देशमुख म्हणालेत .
हेही वाचा:























