वाल्मिक कराड, विष्णू चाटेचा जेलमधून सुटकेसाठी अर्ज, धनंजय देशमुख म्हणाले, आरोपींना वेगवेगळं ठेवा, उद्याच्या सुनावणीत...
या प्रकरणात पुरवणी दोषारोप पत्र लवकरच दाखल होणार आहे,यासाठी तपासही सुरू आहे.या तपासात आणखी खुलासे समोर येणे बाकी असल्याचंही धनंजय देशमुख म्हणालेत.

Beed: संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आणि आर्थिक घोटाळ्यांमधील आरोपी सुरेश कुटे,बबन शिंदे आणि सतीश उर्फ खोक्या भोसले यांच्यामुळे बीडचे जिल्हा कारागृह गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. दरम्यान, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेने न्यायालयात सुटकेसाठी अर्ज केला आहे. गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात ठेवण्यात यावे अशी मागणी केली आहे .उद्याच्या तारखेला या प्रकरणात चार्ज फ्रेम झाला पाहिजे,अशी अपेक्षा असल्याचेही ते म्हणालेत . हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले .(Dhananjay Deshmukh)
संतोष देशमुख प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाचे दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर उद्या ( 7 एप्रिल) या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पाचवी सुनावणी होणार आहे. दरम्यान, धनंजय देशमुख व कुटुंबियांनी याआधीही कारागृहाच्या कार्यपद्धतीवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. तर पूर्वी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आणि गेवराई येथे दुय्यम कारागृहे कार्यरत होती. मात्र, त्या कारागृहांचे संचालन बंद करण्यात आल्याने सर्वच न्यायाधीन बंदींना आता बीड कारागृहात ठेवले जात आहे. परिणामी, व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
या प्रकरणात पुरवणी दोषारोप पत्र लवकरच दाखल होणार आहे,यासाठी तपासही सुरू आहे.या तपासात आणखी खुलासे समोर येणे बाकी आहे.उद्याच्या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम हजर असणार आहेत.वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांच्याकडून न्यायालयात डिस्चार्ज एप्लीकेशन करण्यात आले आहे.ते त्यांचे काम करत आहेत न्यायाच्या भूमिकेत असलेले सरकारी वकील त्याची पूर्तता करतील. मारहाणीच्या व्हिडिओची मागणी आरोपींच्या वकिलांकडून करण्यात आली आहे.त्यांचे अधिकार वापरून त्यांनी तशी मागणी केली असेल ते देतील. या न्यायालयीन बाबींची सर्वस्वी जिम्मेदारी आणि अधिकार हा वकिलांचा आहे.उद्याच्या तारखेला या प्रकरणात चार्ज प्रेम झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. यानंतर आम्ही हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी करणार आहोत. असं धनंजय देशमुख म्हणाले.
आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावं: धनंजय देशमुख
याचबरोबर सर्व मकोका अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावं अशी देखील मागणी आम्ही करणार आहोत.यामुळे कारागृहातील घटना बंद होतील आणि त्यांना सुविधा मिळणं ही बंद होईल. विष्णू चाटे याच्याकडून बीड कारागृहात स्थलांतरित होण्यासाठी अर्ज केला गेला आहे.यावर आरोपीच्या वकिलानी ही बाब नाकारली होती मात्र अँड.कोल्हे यांनी त्यावेळेस केलेला अर्ज दाखला म्हणून आता नवीन अर्जाला फार काही महत्त्व राहणार नाही. लवकरात लवकर कृष्णा आंधळेला पकडण्यात याव अशी माझी मागणी आहे.कृष्णा आंधळे संदर्भात मस्साजोगला आलेली ती महिला ही मनोरुग्न होती असे पोलिसांनी सांगितले.तसेच तो नाशिक येथे असल्याची माहिती होती मात्र सीसीटीव्ही फुटेज मध्ये तो आढळून आला नाही. या प्रकरणात ज्या ज्या लोकांनी खंडणीसाठी अपहरणासाठी आणि खुनासाठी षडयंत्र केले आहे या सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. असंही ते म्हणाले.
हेही वाचा:
























