Kundlik Khade : कुंडलिक खांडेंच्या अडचणीत वाढ, कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे पोलीस कोठडीत वाढ
Beed Kundlik Khande Police Custody : व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे कुंडलिक खांडे यांची आधी शिंदे गटाकडून हाकालपट्टी करण्यात आली होती. आता पोलीस कोठडीतही वाढ करण्याचा बीड जिल्हा न्यायालयाने आदेश दिला.
बीड : व्हायरल ऑडिओ प्रकरणी अटकेत असलेले शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (kundalik Khande) यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. बीड न्यायालयाने (Beed district court) याबाबत आदेश दिले असून आधी शिंदे गटातून हाकालपट्टी आणि आता पोलीस कोठडीतही वाढ झाल्याने कुंडलिक खांडे यांच्या अडचणीत वाढ झालीय.
कुंडलिक खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप काही दिवसांपासून व्हायरल झाली हाेती. यामध्ये आपण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात काम केलं असून बजरंग बाप्पांना मदत केली असे बोलताना ऐकू येत आहे. यानंतर कुंडलिक खांडे चर्चेत आले होते. या क्लिपनंतर एप्रील महिन्यात त्यांच्यावर ३०७ कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यानंतर बीड जिल्हा न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसाची वाढ केली आहे.
या प्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कथित व्हायरल क्लिपनंतर त्याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटल्याचे दिसून आले. बीड पोलिसांकडे याबाबत गुन्हा दाखल झाला.
काय आहे या कथित व्हायरल क्लिपमध्ये?
कुंडलिक खांडे यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना लोकसभा निवडणूकीत मदत केल्याची कबुली ऐकू येत असून लोकसभा निकालापूर्वी ही क्लिप व्हायरल झाली होती. तसेच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात काम केल्याचेही रेकॉर्ड झाल्याने खळबळ माजली होती.
ही बातमी वाचा :