बीडमध्ये मुसळधार पाऊस, पापनाशिणी नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला, वाहतूक ठप्प
Beed : बीडसह हिंगोली जिल्ह्यात आज (दि.1) जोरदार हजेरी लावली. पावसामुळे परळी-बीड मार्गावरील पापनाशिणी नदीवर केलेला पर्यायी पूल वाहून गेलाय. त्यामुळे वाहतूक ठप्प झालीये.

Beed : बीडसह हिंगोली जिल्ह्यात आज (दि.1) जोरदार हजेरी लावली. पावसामुळे परळी-बीड मार्गावरील पापनाशिणी नदीवर केलेला पर्यायी पूल वाहून गेलाय. त्यामुळे वाहतूक ठप्प झालीये. शिवाय वाण - वाप नदीच्या पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे परळीहून बीड कडे जाणारी वाहतूक ही नागापूरहून शिरसाळाच्या दिशेने वळवण्यात आली आहे. परळी - बीड राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा फटका आता प्रवाशांना बसताना दिसून येत आहे.
परळीकडून बीडकडे जाणारी वाहतूक ही नागापूर मार्गे शिरसाळाकडे वळवण्यात आली
या मार्गावर असलेल्या सेलू येथील पापनाशी नदीवर केलेला तात्पुरता पुल वाहून गेल्याने बीड - परळी वाहतूक बंद झाली आहे. वाण - वाप नदीवरील पुलावरूनही पाणी वाहू लागल्याने या पुलावरील वाहतूक बंद झालेली आहे.काही दिवसांपूर्वीच वाण नदीचा तात्पुरता पुल वाहून गेला होता पुन्हा सत दिवसानंतर तीच परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे. आज दिवसभरात झालेल्या पावसामुळे बीड परळी रोडवर पुलावरून पाणी जात असल्याने परळीकडून बीडकडे जाणारी वाहतूक ही नागापूर मार्गे शिरसाळाकडे वळवण्यात आली आहे.
पूरनियंत्रण करण्यासाठी प्रशानस सज्ज
जिल्हयातील प्रकल्पामध्ये सततच्या पावसामुळे वाढ होत असून नदी धरणे व बंधाऱ्यांपुढील नदीपात्रा नजीक राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहे.गोदावरी नदीवरील दिग्रस बंधाऱ्याचे दोन दारे उघडण्यात आली आहे. अंतेश्वर बंधाऱ्याची सर्व दारे उघडण्यात आली आहे.पूर्णा नदीवरील सिध्देश्वर धरणाची दारे उघडली आहे. त्यामुळे विष्णुपुरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असून या बंधार्याचे देखील चार दरवाजे उघडण्यात आले आहे.विष्णूपुरी धरणाचे आणखी काही दारे उघडली जाऊ शकतात. त्या खालच्या आमदुरा धरणाचे 16 पैकी 11 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्या खालील बडेगाव धरणाचेही नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे.
नांदेडमध्ये पावसाची फटकेबाजी
नादेड जिल्ह्यामध्ये 24 तासात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे. दहा वाजेपर्यंत 136 मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला. तालुक्याच्या सिंदगी,उमरी बाजार व किनवट या मंडळात पावसाचा जोर अधिक आहे. किनवटपाठोपाठ हिमायतनगर, माहूर,हदगाव, भोकर, अर्धापूर, मुदखेड, या तालुक्यांमध्ये सध्या पाऊस जोरदार सुरू आहे. नागरिकांनी नाले, ओढे, तलावाच्या भागात जाण्याचे आज टाळावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनामा पाऊस थांबल्यानंतर करण्यात यावा असे निर्देश प्रशासनाने दिले आहे. प्राथमिक अंदाजानुसार व आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात झालेल्या अतिवृष्टी मध्ये सहा मोठी दुधाळ जनावरे, पाच छोटी दुधाळ जनावरे एक बैल मृत्युमुखी पडले आहे तर 21 घरांची अंशतः पडझड झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मला माझ्या बोटांची चिंता वाटते, बोट भलत्याच व्यक्तीच्या हातात दिल्यावर काय होतं आता दिसतंय; शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल
























