एक्स्प्लोर

Beed Railway: बीड ते अहिल्यानगर प्रवास भाडे किती? रेल्वे मार्गावर एकूण 15 स्टेशन, कमीत कमी तिकीट 10 रुपये

Beed Railway बीड-अहिल्यानगर-परळी मार्गावर ही रेल्वे धावणार असून पहिल्या टप्प्यात आज बीड ते अहिल्यानगर या 167 किमी मार्गावर बीडकरांचा प्रवास सुरू झाला आहे.

बीड: मराठवाड्यातील बीडकरांसाठी ऐतिहासिक क्षण आणि जिल्ह्याच्या विकासाला गती देणारा सोहळा आज नव्याने उभारण्यात आलेल्या बीड रेल्वे (Beed railway) स्थानकावर संपन्न झाला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेच्या उपस्थितीत हा सोहळा राजकीय टोले आणि श्रेयवादाच्या फटाक्यांनी गाजला. व्यासपीठावरुन भाषण करणाऱ्या सर्वच राजकीय नेत्यांनी बीड (Beed) रेल्वेच्या आठवणींना उजाळा दिला, रेल्वेसाठी केलेल्या संघर्षाची आठवण सांगितली. त्यानंतर, बीड-अहिल्यानगर रेल्वे मार्गावर पहिल्यांदा रेल्वे धावली. मंत्री महोदयांनी हिरवी झेंडी दाखवली अन् रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांनी फोटो, व्हिडिओसह आनंद साजरा केला. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी बीड ते अहिल्यानगर (Ahilyangar) प्रवासासाठी मार्गक्रमण केले.

बीड-अहिल्यानगर-परळी मार्गावर ही रेल्वे धावणार असून पहिल्या टप्प्यात आज बीड ते अहिल्यानगर या 167 किमी मार्गावर बीडकरांचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे, बीड ते अहिल्यानगर रेल्वेने बीडकरांना प्रवास करता येईल, विशेष म्हणजे या प्रवासाचे तिकीटदरही समोर आले असून कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 40 रुपयांपर्यंतचे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. म्हणजेच, बीडहून केवळ 40 रुपयांत अहिल्यानगरला जाता येईल. बीड ते अहिल्यानगर या रेल्वे प्रवासात एकूण 15 रेल्वे स्थानक असणार आहे. पहिले स्टेशन राजुरी नवगण असून बीडवरुन फक्त 10 रुपयांत येथे जाता येईल. अहिल्यानगर-बीड-परळी हा संपूर्ण रेल्वेमार्ग 261 किमीचा आहे. त्यापैकी, आज फक्त बीड-अहिल्यानगर या 166 किमी मार्गाचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. उर्वरीत बीड-परळी टप्प्यातील काम अद्याप बाकी आहे.

बीड रेल्वे स्टेशन शहरापासून 6 किमी दूर

बीडचे नवे रेल्वे स्टेशन हे बीड बस स्टँडपासून 6 किलोमीटर दूर पालवण गावात आहे. बीड ते अहिल्यानगर डेमू रेल्वेचे तिकीट 40 रुपये एवढे ठेवण्यात आलं आहे. मात्र, बीड शहरापासून 6 किमी दूर असलेल्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षावाले 150 ते 200 रुपयांपर्यंत भाडे आकारू शकतात, असे सांगण्यात येते.

बीडमधून अहिल्यानगरसाठी दुपारी 1 वाजता निघणार ट्रेन

बीड-अहिल्यानगर रस्ता कापण्यासाठी बाय रोड अडीच ते पावणे ती तास लागतात. मात्र, या रेल्वेने किमान 5.30 तास लागणार आहेत. कारण, सरासरी डेमू रेल्वेचा वेग 30 किमी प्रती तास असेल. या मार्गावर दररोज एक गाडी येणार असून गाडी क्रमांक 71441, सकाळी 6.55 वाजता अहिल्यानगरवरुन निघणार असून ती 12.30 वाजता बीडला पोहोचणार आहे. तर, तीच गाडी क्रमांक 71442, दुपारी 1 वाजता परत अहिल्यानगरसाठी जाणार असून सायंकाळी, 6.30 वाजता अहिल्यानगरला पोहोचणार आहे. आठवड्यातील सहा दिवस ही रेल्वे धावणार आहे.
Beed Railway: बीड ते अहिल्यानगर प्रवास भाडे किती? रेल्वे मार्गावर एकूण 15 स्टेशन, कमीत कमी तिकीट 10 रुपये

कशी असेल बीडची रेल्वे?

बीड ते अहिल्यानग असा 167 किमीचे अंतर ही रेल्वे कापणार आहे. त्यामध्ये बीडसह एकूण 15 स्थानकांचा समावेश आहे.

  • बीड
  • रायमोह
  • रायमोहा
  • विघनवाडी
  • जाटनांदूर
  • अळमनेर
  • हतोला
  • वेताळवाडी
  • न्यू आष्टी
  • कडा
  • न्यू धानोरा
  • सोलापूरवाडी
  • न्यू लोणी
  • नारायणडोहो
  • अहिल्यानगर

हेही वाचा

बीडकरांच्या स्वप्नपूर्ती सोहळ्यात पंकजा मुंडे भावुक, वडिलांची आठवण; खासदार सोनवणेंच्या बॅनरवरुनही टोला

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare : देवेंद्र फडणवीस नागगोळी, उद्धव ठाकरे सुतळी बॉम्ब, तर एकनाथ शिंदे...; फटाक्यांची उपमा देत सुषमा अंधारेंकडून जोरदार राजकीय आतिषबाजी, कुणाबद्दल काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस नागगोळी, उद्धव ठाकरे सुतळी बॉम्ब, तर एकनाथ शिंदे...; फटाक्यांची उपमा देत सुषमा अंधारेंकडून जोरदार राजकीय आतिषबाजी, कुणाबद्दल काय म्हणाल्या?
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Manoj Jarange : वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
वैभव चव्हाणच्या परिवाराची मनोज जरांगेंनी घेतली भेट; एफआयआर कॉपी वाचली, म्हणाले, 'फोटो पाहिले, अंगावरती प्रचंड जखमा, मग हे घातपात असायला पाहिजे, जाणून-बुजून....'
Beed Crime News: बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ
बोगस प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस आणलं, वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, पोलिसांत गुन्हा दाखल, बीडमध्ये खळबळ

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Morcha Kolhapur: भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
भस्मासूर, रेडा, म्हशी, घोडा अन् कोल्हापुरी पायताण! कुठं बी हुडिक, रस्त्यावर नुसतं पब्लिक; गोकुळ मोर्चाला सुरुवात होण्यापूर्वीच दसरा चौक तुंडूब भरला
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
लक्षात ठेवलंय 2029, हे कोल्हापूर हाय.. गोकुळसाठी एवढा रडीचा डाव खेळणाऱ्यांनी विचार करा विधानसभेला काय काय केलं असेल? गोकुळच्या मोर्चात महायुतीविरोधात उद्रेक, पायताण सुद्धा आणलं
Gokul Kolhapur Dasara Chowk: सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
सतेज पाटलांच्या एका हाकेवर गोकुळसाठी हजारोंची गर्दी जमली, कोल्हापूरच्या दसरा चौकात मुंगी शिरायलाही जागा उरली नाही!
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Vaibhav Sooryavanshi : ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
ना कुटुंबाने खरेदी केली, ना पैसे मोजले! 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दिवाळीच्या मुहूर्तावर मिळाली शानदार कार, कारण काय?
Vivekanand Patil Kolhapur Gokul Morcha speech: मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो, गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
मंत्रालयात कंस मामा बोटं मोडितो, गोकुळच्या मोर्चातील विवेकानंद पाटलांचं जळजळीत भाषण, महायुती सरकारला झोडपलं
Gokul Kolhapur Dasara Chowk Morcha: गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
गोकुळच्या मोर्चात म्हशीने मार्केट खाल्लं, गळ्यात लटकवलेल्या बोर्डाची चर्चा, कोल्हापूरकरांचा नादच खुळा
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपाराजवळ फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Embed widget