Beed : संतोष देशमुख हत्या प्रकरणी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल, आरोपपत्रात नेमकं काय?
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांची हत्या झाल्यानतंर 80 दिवसांनी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं असून हा खटला आता कोर्टात चालणार आहे.

बीड : संतोष देशमुख हत्या प्रकरणी, जवळपास दीड हजार पानांचं आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. पवनचक्की खंडणी प्रकरण आणि अॅट्रॉसिटी प्रकरणातही दोषारोपपत्र दाखल झालं. यावेळी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बसवराज तेली आणि एसआयटीचे प्रमुख किरण पाटील न्यायालयात उपस्थित होते. आता सरपंच हत्येचा खटला कोर्टात चालणार असून, विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे हा खटला लढवणार आहेत.
काय आहे आरोपपत्रात?
- वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला सहभाग आणि त्याचे पुरावे.
- सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणारे सात आरोपींनी कशाप्रकारे हात त्याचा कट रचला आणि हत्या केली याचे पुरावे.
- या हत्याकांडामध्ये कुणाकुणाचा सहभाग आहे याचा तपास.
- संतोष देशमुख यांच्या हत्येचा मूळ कारण समोर येणार.
- खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सहभाग आहे का याचाच तपास समोर येणार.
- खंडणी प्रकरण त्यानंतर ॲट्रॉसिटी प्रकरण आणि त्यानंतर हत्या प्रकरण या तिन्ही प्रकरणाचा एकमेकाशी काही संबंध आहे का याचे पुरावे.
- या प्रकरणातील आरोपींना फरार होण्यात कोणी सहकार्य केले आरोपी फरार झाल्यानंतर कुठे होते काय केले यासंदर्भातील ही सत्य दोषारोप पत्रातून समोर येणार.
- सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी वापरलेले शस्त्र आणि हत्या नेमकी कशा पद्धतीने झाली याचेही सत्य समोर येणार.
- संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली का आणि दोषी आहेत का याचेही सत्य सीआयडीच्या तपासातून समोर येणार.
- या प्रकरणाशी संबंधित असलेल्या कुणाकुणाची चौकशी झाली हे देखील दोषारोप पत्र मधून समोर येणार.
- वाल्मिक कराडने खंडणी प्रकरणातून जमा केलेल्या संपत्ती संदर्भातील माहिती देखील समोर येण्याची शक्यता.
- वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यांच्या संघटित गुन्हेगारीचे आणखी काही प्रकार घडले होते का? तसेच आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी यासंदर्भातही आरोप पत्रात सविस्तर माहिती.
- डिजिटल पुरावा मधून या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणि सीडीआर मधून या प्रकरणाशी कुणाकुणाशी संपर्क झाला हे देखील सत्य समोर येऊ शकते.
ही बातमी वाचा:
























