एक्स्प्लोर

Beed News: बीडमध्ये रात्री मोठा राडा, दीपक देशमुखांचा नगरपरिषद कर्मचाऱ्यावर गंभीर आरोप, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी अन् पोलिसांचा लाठीचार्ज; स्ट्राँगरूम बाहेर नेमकं काय घडलं?

Beed News: बुधवारी रात्री 11 वाजता दीपक देशमुख हे नगर परिषदेत स्ट्राँगची पाहणी करण्यासाठी गेले असताना नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Beed News: बीडच्या परळीमध्ये (Parli) स्ट्राँग रूम असलेल्या नगरपरिषदेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख (Deepak Deshmukh) आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे दिसून आले. यावेळी रात्री नगरपरिषद कार्यालयासमोर तणावाचे वातावरण झाले होते.

बुधवारी रात्री 11 वाजता दीपक देशमुख हे नगर परिषदेत स्ट्राँगची पाहणी करण्यासाठी गेले असताना नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप देशमुख यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यावर केला. यावेळी नगरपरिषदेसमोर मोठ्या प्रमाणात देशमुख समर्थक जमा झाले. दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान शिवीगाळीचा आरोप केलेल्या कर्मचाऱ्याचे मेडिकल करण्याची मागणी यावेळी देशमुख यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची माहिती खासदार बजरंग सोनवणे यांना फोनवरून त्यांनी दिली.

Beed News: पोलिसांकडून जमावावर सौम्य लाठीमार

यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाऊ नये, याकरिता गेट बाहेर उभ्या असलेल्या जमावावर सौम्य लाठीमार केला. साधारण दोन तास या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. नगरपरिषदेबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

Beed News: नगरपरिषदेसमोर तणावाचे वातावरण

याआधी बुधवारी सकाळी नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर नगरपरिषद इमारतीत असलेल्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीनमध्ये ठेवण्यात आल्या. या ठिकाणच्या कर्मचाऱ्यावर आमचा विश्वास नसल्याचे सांगत आमची राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी देखील दीपक देशमुख यांनी केली होती. त्यानंतर या स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही फुटेज उमेदवाराला पाहता यावे, यासाठी खाली असलेल्या पार्किंगमध्ये टीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काल रात्री झालेल्या राड्यामुळे नगरपरिषदेसमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

Gondia News: सालेकसा ईव्हीएम छेडछाड आरोप प्रकरणात मोठी अपडेट

दरम्यान, गोंदियाच्या सालेकसा नगरपंचायतीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड प्रकरणावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी तहसील कार्यालयामध्ये घेराव करून याविषयी स्पष्टीकरण मागितले होते. त्यावरून जवळपास 12 तास आंदोलन करण्यात आले. त्यानंतर रात्री उशिरा  या प्रकरणातील अहवाल हा उपविभागीय अधिकाऱ्यांनी तयार करून जिल्हाधिकारी यांना पाठवला आणि राज्य निवडणुकाला आयोगाला पाठवण्यात आला. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग यावर कोणतं निर्णय घेते? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. परंतु स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाड करून वोट टेम्परिंग तर झाली नाही ना? असा संशय व्यक्त केला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.  

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Akola News: रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मासाचे गोळे; आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात?, अमोल मिटकरींचा धक्कादायक आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आई आणि सात दिवसाच्या बाळाचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
सोलापुरात काँग्रेस शहराध्यक्षांचा केवळ 251 मतांनी विजय; भाजप आमदाराचे भाऊजी, सर्वाधिक 14 हजार मताधिक्यांनी विजयी
Maharashtra Goverment Cabinet Decision: राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
राज्यातील 29 महापालिकांचा निकाल लागताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत 10 मोठे निर्णय; मुंबईकरांना दिलासा
Eknath Shinde Municipal Corporation Election Result 2026 : जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
जिथे भाजपची साथ सोडली, तिथे तिथे एकनाथ शिंदेंना फटका, नवी मुंबईतही टांगा पलटी, कुठे कुठे अपयश हाती?
Embed widget