Beed : बीडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क उंटावरून वाटली साखर; राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याचा आनंद केला साजरा
Congress Celebration in Beed : राहुल गांधी यांना न्यायालयाने दिलासा दिल्याचे वृत्त येताच बीडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क उंटावरून 5 क्विंटल साखर वाटत आनंद साजरा केला आहे.
Congress Celebration in Beed : काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) यांना मोठा दिलासा मिळाला असून, मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी मिळणार आहे. तर न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा (Congress Celebration) केला आहे. मात्र, बीड (Beed) जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आगळ्यावेगळ्या जल्लोषाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. कारण, राहुल गांधी यांना न्यायालयाने दिलासा दिल्याचे वृत्त येताच बीडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्क उंटावरून 5 क्विंटल साखर वाटत आनंद साजरा केला आहे.
मोदी आडनावाच्या मानहाणीप्रकरणी राहुल गांधी यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली. त्यानंतर, बीडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. यावेळी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. सोबतचा रॅली काढून बीड बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी उंटावरून 5 क्विंटल साखर वाटप करून आनंद साजरा केला. त्यांच्या या अनोख्या जल्लोषाची शहरभरात जोरदार चर्चा पाहायला मिळाली.
काँग्रेस कार्यकर्त्यांचे अनोखं जल्लोष
- राहुल गांधींच्या बाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे बीडच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
- यावेळी बीड शहरातील प्रमुख रस्त्यांवरून वाजत गाजत रॅली काढण्यात आली.
- तसेच फटक्यांची जोरदार आतिषबाजी, घोषणाबाजी करण्यात आली.
- तसेच बीडच्या शहरवासियांना उंटावरून 5 क्विंटल साखर वाटण्यात आली.
- ज्यात शहरातील नवा मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिमेंट रोड गुरूवार पेठ ते माता श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसरात रॅलीचा समारोप करण्यात आले.
काय आहे प्रकरण?
राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान कर्नाटकात भाषण करताना मोदी आडनावाबाबत भाष्य केले होते. 'सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का आहे?' असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. यावरुन भाजपचे नेते पूर्नेश मोदी यांनी सुरत कोर्टात राहुल गांधींच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, 'राहुल गांधींनी असं म्हणत मोदी आडनाव असलेल्या लोकांची बदनामी केली आहे.' त्याप्रकरणी सुरतमधील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मार्च महिन्यात निकाल देताना राहुल यांना दोषी ठरवले. त्यांना दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द झाली होती. मात्र, आता याक निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी स्थगिती दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: