मोठा गाजावाजा करत सुरु झालेली नगर-आष्टी बहुप्रतिक्षित रेल्वे बंद; 'ही' आहेत कारणं
Ashti Ahmednagar Railway Line : विशेष म्हणजे रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याने ही रेल्वे बंद पडल्याचे कारण दिले जात आहे.
Ashti Ahmednagar Railway Line Stop : बीड (Beed) जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याची आणि अनेक वर्षांची मागणी असलेल्या अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी अशी 'डेमू रेल्वे' सेवा 23 सप्टेबर 2022 रोजी मोठा गाजावाजा करून सुरु करण्यात आली होती. मात्र अवघ्या 10 महिन्यात आता ही रेल्वे सेवा बंद पडली आहे. विशेष म्हणजे रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याने ही रेल्वे बंद पडल्याचे कारण दिले जात आहे.
अहमदनगर ते आष्टी अशी रेल्वे सुरु करण्याची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. दरम्यान दहा महिन्यांपूर्वी म्हणजेच तब्बल 95 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही रेल्वे अखेर सुरू झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या रेल्वे सेवेला ग्रीन सिग्नल देण्यात आले होते. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.
मात्र दहा महिन्यांपूर्वी सुरू झालेली अहमदनग-आष्टी रेल्वे आता बंदी पडली आहे. प्रवाशांच्या अत्यंत कमी प्रतिसाद, चालकाची कमतरता आणि अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान विद्युतिकरणाचे काम सुरू असल्याने या रेल्वेच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यात 13 ऑक्टोबरपर्यंत या रेल्वेच्या दोन्ही फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर पुन्हा रेल्वे फेऱ्या सुरु झाल्या असतानाच, गेल्या दोन महिन्यापासून या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याने सोलापूर रेल्वे प्रशासनाने दोन्ही फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांचा प्रतिसाद मिळेना...
गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर ते आष्टी रेल्वे सुरु करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान दहा महिन्यांपूर्वी ही रेल्वे सुरु झाली. मोठ्या प्रतीक्षानंतर अहमदनगर ते आष्टी रेल्वे सुरू झाल्याने बीडकरांनी आनंद साजरा केला. मात्र या रेल्वे मार्गाचा विद्युतीकरण होणार असून, त्यासाठी ऑक्टोबरपर्यंत ही गाडी रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रवाशांचा देखील कमी प्रतिसाद मिळत असल्याने रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.
अहमदनगर-आष्टी रेल्वे वेळापत्रक...
- सोमवार ते शनिवार अहमदनगरहून सकाळी पहिली फेरी 7.45 वाजता निघून, आष्टी येथे 10.15 वाजता पोहचत होती.
- त्यानंतर आष्टीमधून सकाळी 11 वाजता निघून दुपारी 1.45 वाजता अहमदनगरमध्ये पोहचायची.
- त्यानंतर पुन्हा दुपारी दुसरी फेरी 3.40 वाजता अहमदनगरमधून निघून, सांयकाळी 6.15 वाजता आष्टी येथे पोहचते
- त्यानंतर आष्टीमधून सांयकाळी 7 वाजता निघून, रात्री 9.45 वाजता पोहचते.
इतर महत्वाच्या बातम्या: