मन सुन्न करणारी घटना! नववीत शिकणाऱ्या मुलीला शाळेतच हृदयविकाराचा झटका अन् क्षणार्धात मृत्यू
Beed News : अवघ्या 15 वर्षाच्या विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Beed News : बीड (Beed) शहरात मनाला चटका लावणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. नववीच्या वर्गात शिकणारी एक 15 वर्षाची विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. प्रार्थना संपल्यानंतर ती आपल्या वर्गात बसली असतानाच, तिला अचानक भोवळ आली आणि काही कळण्या अगोदरच या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेशमा शेख असे या मुलीचं नाव आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये खळबळ उडाली असून, चिंताही वाढली आहे. अवघ्या 15 वर्षाची विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नववीच्या वर्गात शिकणारी 15 वर्षीय रेश्मा नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेली होती. दुपारची सुट्टी झाल्यानंतर तिने आपल्या आईसोबत शाळेत जेवण केलं. जेवण झाल्यावर पुन्हा ती आपल्या वर्गात जाऊन बसली. पण याचवेळी तिला अचानक भोवळ आल्यानं ती बेशुद्ध झाली. त्यानंतर शिक्षकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्या अगोदरच 15 वर्षाच्या रेशमाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने रेश्माच्या आई-वडीलांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या 15 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालं असल्याचं त्यांना अजूनही विश्वास बसत नाही.
रेश्मा बीड शहरातल्या एका खाजगी शाळेमध्ये नववीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दुपारपर्यंत शाळेत जायचे आणि त्यानंतर तिचं ट्युशन असायचं. त्यामुळे अभ्यासाच्या ताण-तणावातून तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र तिला शाळेमध्ये आणि घरीही अभ्यासाचा दबाव नसल्याचं तिच्या वडिलांनी सांगितल आहे. नियमित शाळेत जाणारी रेश्मा शाळा सुटल्यानंतर घरी यायची. मात्र ती आता परत कधीच येणार नाही. तर 15 वर्षाच्या रेशमाचा असा अकस्मात मृत्यू झाल्यान बीडमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुलांची पुरेशी झोप महत्वाची...
कोरोनानंतर आपल्या सगळ्यांच्याच जीवनशैलीमध्ये बदल झाला आहे. काम करण्याच्या पद्धती आणि शिक्षणाच्या पद्धतीमध्ये देखील मोठे बदल करण्यात आले आहेत. त्यातच मुलांचा असलेला ऑनलाईन अभ्यास आणि त्यामुळे त्यांच्या हातात आलेला मोबाईल या सगळ्या गोष्टींमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ज्यात मुलं पुरेशी झोपत नसल्याने लहान वयातच मुलांना अनेक दुर्धर आजारांचा सामना करावा लागत असल्याचे क्रीडा अधिकारी सांगतायत.
लेकरावर अपेक्षांचा ओझं लाडू नका...
सध्याचे जग इतकं धकाधकीचं झालंय की, कुणाच्या आयुष्याचं कधी काय होईल हे सांगता येत नाही. मात्र, पंधरा ते सोळा वर्षाची चिमुरडी मुलं सुद्धा अचानक या जगाला सोडून जातायत. मुलांचं करिअर, त्यांचं शिक्षण याविषयी प्रत्येक पालक जागरूक असतो. म्हणून नकळत्या वयात आपल्या अपेक्षांचा ओझं आम्ही आमच्या लेकरावर लादतोय का? याचा विचार करण्याची आता वेळ आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )