एक्स्प्लोर

Beed : मुंडे बहिण-भावात श्रेयवादावरुन जुंपली, परळीसाठी 100 कोटींचा निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दोन्ही बाजूंकडून दावा 

Dhananjay Munde Vs Pankaja Munde : परळीतील विकासकामांना निधी हा आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा दोन्ही बाजूंकडून केला जात आहे.

बीड : परळीतील दोन उड्डाणपुलांच्या कामासाठी केंद्रीय मंत्रालयाने 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याच्या श्रेयवादावरुन आता मुंडे बहिण आणि भावात जुंपल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी हा निधी आपल्यामुळे मिळाल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही निधी आपल्यामुळेच मिळाल्याचा दावा केला आहे. 

परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरणासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यावरुन या दोघांनीही आपल्यामुळेच हा निधी मिळाल्याचा दावा केला असून गडकरींचे आभार मानले आहेत. 

पंकजा मुंडे यांचे ट्वीट
परळी शहरातील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूलाचे विस्तारीकरण आणि चौपदरीकरण तसेच अंबाजोगाई-लातूर मार्गावरील बीड जिल्हयाच्या हद्दीतील रस्त्याचे चौपदरीकरण यासाठी शंभर कोटी रूपयाचा निधी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. डॉ.प्रितम मुंडे यांच्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. याबद्दल पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत गडकरी यांचे आभार मानले आहेत.  

धनंजय मुंडेंचा दावा
श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल चौपदरीकरण व राज्य मार्ग 361 एफ वरील परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते औष्णिक विद्युत प्रकल्पाचे प्रवेशद्वार या रस्त्याचे व त्यावरील रेल्वे उड्डाण पुलासह चौपदरीकरण करणे ही दोन कामे समाविष्ट करण्यात आली असून यासाठी 100 कोटी रुपये याच आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही कामांची लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, धनंजय मुंडे यांनी समस्त परळीवासीयांच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh on Devendra Fadnavis : दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल
दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...
Stree 2 Who Is Sarkata : धडकी भरवणारा 'स्त्री 2' मधील 'सरकटा' आहे तरी कोण? रियल लाईफमध्ये म्हणतात पोलीस दलातील 'खली'; पाहा फोटो
धडकी भरवणारा 'स्त्री 2' मधील 'सरकटा' आहे तरी कोण? रियल लाईफमध्ये म्हणतात पोलीस दलातील 'खली'; पाहा फोटो
Badlapur School: शाळेच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही होते का? अक्षय शिंदेचं कुटुंबाकडेच शाळेच्या साफसफाईचं काम
शाळा सुटल्यानंतर अक्षय शिंदेचं कुटुंब रोज शाळेत जायचं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत अक्षयचे आई-वडील म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 22 ऑगस्ट 2024: ABP MajhaKolhapur :  ABP Majhaच्या कॅमेरामनला धक्काबुक्की; कोल्हापूरकर आक्रमकRitwik chatterjee Pune  : बदलापूरमधील दुर्घटनेनंतर बाल मानसोपचार तज्ज्ञांचा पालकांना सल्ला काय ?Sanjay Raut vs Vikas Thackeray : पूर्व नागपूर वरून मविआत रस्सीखेच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh on Devendra Fadnavis : दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल
दोन दिवसांपासून राज्याचे गृहमंत्री कुठे गायब आहे? बदलापूर घटनेवर उत्तरे कधी देणार आहेत! अनिल देशमुखांचा सवाल
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली? शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावरून संजय राऊतांचं थेट राज्यपालांना आव्हान, म्हणाले...
Stree 2 Who Is Sarkata : धडकी भरवणारा 'स्त्री 2' मधील 'सरकटा' आहे तरी कोण? रियल लाईफमध्ये म्हणतात पोलीस दलातील 'खली'; पाहा फोटो
धडकी भरवणारा 'स्त्री 2' मधील 'सरकटा' आहे तरी कोण? रियल लाईफमध्ये म्हणतात पोलीस दलातील 'खली'; पाहा फोटो
Badlapur School: शाळेच्या बाथरुमबाहेर सीसीटीव्ही होते का? अक्षय शिंदेचं कुटुंबाकडेच शाळेच्या साफसफाईचं काम
शाळा सुटल्यानंतर अक्षय शिंदेचं कुटुंब रोज शाळेत जायचं, सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत अक्षयचे आई-वडील म्हणाले...
Badlapur School Case:  ''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
''अशी थापेबाजी करणारा नराधम 'माणूस'म्हणून ...''अभिनेत्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका
Samarjit Ghatge : मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
मी आता खूप पुढे गेलोय, मागे येणं शक्य नाही! धनंजय महाडिकांच्या भेटीनंतर समरजित घाटगेंचं मोठं वक्तव्य
Vidhan Sabha Election 2024: हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
हायकमांडचा आदेश आल्यास नागपूरमधील विधानसभेच्या सगळ्या जागा ठाकरे गटासाठी सोडू: विकास ठाकरे
Badlapur School Case: बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
बदलापूर आंदोलनाबाबत संजय राऊतांकडून महत्त्वाची कागदपत्रं शेअर, 'बदलापुरमधील आंदोलक बाहेरचे' नरेटिव्ह खोडून काढलं
Embed widget