Beed Accident : केजजवळ वळणावर थांबलेल्या ट्रकला स्विफ्टची धडक, दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी
Beed Kej Accident : भरधाव वेगाने आलेल्या स्विफ्टने थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
बीड : जिल्ह्यातील केजजवळ झालेल्या भीषण अपघात दोन जण जागीच ठार झाले तर तिघे जखमी झाल्याची घटना घडली. मस्साजोग ते केज दरम्यान कोरेगाव फाट्या जवळ बुधवारी सकाळी स्विफ्ट कारने एका ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्या अपघातात कार मधील आंध्रप्रदेशातील एक महिला आणि एक पुरुष जागीच ठार झाले. तर कारमधील इतर दोघे आणि ट्रक ड्रायव्हर असे तिघे जखमी झाले आहेत. दोन्ही मतयांची ओळख अद्याप पटलेली नाही.
बुधवारी सकाळी बीड कडून अंबाजोगाईकडे येणारी ट्रक हा कोरेगावच्या वळणावर थांबलेला होता. त्या वेळी ट्रक चालक हे त्यांच्या ट्रकची पाहणी करीत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव स्विफ्ट कारने उभ्या ट्रकला जोराची धडक दिली. यात कारमध्ये बसलेले आंध्रप्रदेशातील अनोळखी एक महिला आणि एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारच्या पाठीमागे बसलेले श्रुती संकुता (रा. गुडीवाडा, आंध्रप्रदेश) आणि एक अनोळखी पुरुष हे दोघे जखमी झाले आहेत. तसेच ट्रक ड्रायव्हर रियाज तुराबखाँ पठान हे देखील जखमी झाले आहेत.
बीडमध्ये वीज पडून तीन महिलांचा जागीच मृत्यू
बीडमध्ये शेतात काम करणाऱ्या तीन महिलांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. विजया राधाकिसन खेडकर (वय 45), लंका हरिभाऊ नजर (वय 52 वर्षे) आणि शालनबाई शेषराव नजर (वय 65) असं मयत झालेल्या महिलांची नावं आहेत.
या तीन महिला शेतात काम करत असताना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. वीज पडून मृत्यू झालेल्या तिन्ही महिला चकलांबा येथील रहिवासी असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्या मृत घोषित करण्यात आलं. तर यमुना माणिक खेडकर (वय 65 वर्षे) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही बातमी वाचा: