एक्स्प्लोर

पंकजा मुंडे पोहचल्या बांधावर; आपली व्यथा सांगताना शेतकरी ढसाढसा रडला

Maharashtra Beed News : परतीच्या पावसानं बळीराजा हवालदिल, आपली व्यथा सांगताना पाहणी करण्यासाठी बांधावर आलेल्या पंकजा मुंडेंसमोर शेतकरी ढसाढसा रडला.

Maharashtra Beed News : परतीच्या पावसाचा (Monsoon Retreat) मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून सोयाबीनसह (Soybeans) अन्य पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे. बीड (Beed) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. दिवाळी तोंडावर असताना सगळं काही हातचं गेलं असून, सरकारची मदत मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमधील जाधववाडी शिवारात नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली. यावेळी आपल्या व्यथा सांगताना शेतकऱ्यांना अश्रू आणावर झाले.

पंकजा मुंडे (Pankaja  Munde) यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची माहिती घेतली. यावेळी शेतीतील नुकसानीची माहिती देत असताना भारत जाधव नावाच्या शेतकऱ्याला अक्षरशः रडू कोसळले. "ताई, आमच्यावर आभाळच कोसळलयं. लई नुसकान झालयं..आता जीवाचं बरं वाईट केल्याशिवाय पर्याय नाही. या संकटातून आता तुम्हीच आम्हाला बाहेर काढा असं म्हणत हा शेतकरी ओक्साबोक्शी रडू लागला. पंकजा मुंडे यांनी त्याला धीर देत सावरले. असं काही करू नका..धीर धरा..सरकार नक्की मदत करेल, मी तुमच्या पाठिशी आहे असा विश्वास दिला.

शेतकरी हताश आणि निराश आहे. अशा संकटात त्याला आधार दिला गेला पाहिजे. नुकसान मोठे आहे.  सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी तसेच महामार्गाच्या लगत असलेल्या शेतात निकृष्ट नाली बांधकामामुळे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे, यात दोषी कंत्राटदारावर कारवाई व्हावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना केली. पीक विम्याच्या बाबतीत जिल्हयावर अन्याय होत आहे, पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. विमा कंपनीला सरकारच्या आदेशाचे पालन करावेच लागेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

दिवाळी कशी गोड होणार...

मराठवाड्यात जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली, त्यानंतर आता परतीच्या पावसाने उरल्यासुरल्या पिकांचं मातीमोल झाला आहे. अशात दिवाळी तोंडावर असून, सरकारची कोणतीही मदत बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे बळीराजांनी दिवाळी कशी साजरी करावी असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Ajit Pawar : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा, अजित पवारांची फडणवीसांकडे मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 January 2024Special Report Donald Trump : नागरिकत्व ते मंगळवार स्वारी...निर्णयांचा धडाका; कशी असेल ट्रम्प सरकारची भविष्यातील वाटचाल?Special Report Walmik Karad CCTV : आवादा कंपनीला खंडणी मागितली 'त्या' दिवशीचं सीसीटीव्ही फुटेजSpecial Report Sanjay Shirsat VS Abdul Satta : शिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार वादाचा नवा अंक, पालकमंत्री शिरसाट आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Embed widget