एक्स्प्लोर

Beed : वाल्मिक अण्णाच्या बातम्या मोबाईलवर का पाहतोस? तरुणाला बेदम मारहाण, 'संतोष देशमुख' करण्याची धमकी

Santosh Deshmukh Murder Case : धारूर गावातील एक तरूण संतोष देशमुख हत्या संबंधित बातम्या पाहत असताना त्याला मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

बीड : वाल्मिक कराडच्या बातम्या (Walmik Karad News) मोबाईलवर का पाहतोस असं विचारत दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना बीडमधील धारूर गावात घडली. यापुढे वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडीओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) करू अशी धमकीही त्यांनी दिली. अशोक मोहिते असं मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यावर अंबाजोगाईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप असं मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं आहेत. 

अशोक शंकर मोहिते हा त्याच्या मोबाईलवर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित बातम्या पाहत होता. यादरम्यान वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप त्या ठिकाणी आले. वाल्मिक अण्णाच्या बातम्या का पाहतोस असा त्यांनी जाब विचारला. या दोघांनीही अशोक मोहितेला शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने मारहाण केली. यापुढे जर मुंडे साहेबांच्या आणि वाल्मिक अण्णाच्या बातम्या आणि व्हिडीओ पाहिले तर तुझा पण संतोष देशमुख करू अशी धमकी त्यांनी दिली. 

याप्रकरणी जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असून धारूर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमध्ये आधीच जातीय तणाव निर्माण झाला असताना पुन्हा अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा असामाजिक घटकांवर पोलिसांनी नियंत्रण आणावं अशी मागणी आता सर्व स्तरातून केली जात आहे. 

कृष्णा आंधळे अद्याप फरार

संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने होत आहेत. पण अजूनही कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीला बेड्या ठोकण्यात सीआयडीला यश आलं नाही. शिवाय मनोज जरांगेंच्या आरोपानुसार आंधळेलाल धनंजय मुंडेंनी लपवलं असून तो आजूबाजूच्या जिल्ह्यातच आहे. धनंजय देशमुख यांच्या आरोपानुसार त्याच्याकडे काहीतरी घबाड आहे. त्यामुळे त्याला अटक होत नसल्याचं म्हटलं आहे.

संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे एकत्रच फरार झाले होते. पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी कृष्णा महाराष्ट्रात परतला. पण त्याची वाट न बघता 4 जानेवारीला घुले आणि सांगळे पुण्यात आले आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पण कृष्णा काही हाती आला नाही. एसआयटी आणि सीआयडीची 10-12 पथकं, दीडशे पेक्षा जास्त कर्मचारी तपास करत असूनही कृष्णा आंधळे अद्याप सापडत का नाही हा प्रश्न कायम आहे.

ही बातमी वाचा : 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget