एक्स्प्लोर

VIDEO Beed : सुरेश धस एकदा मागे लागले की डोकं खाऊन टाकतात; धसांचा  'आधुनिक भगीरथ' असा उल्लेख, पंकजा मुंडेंसमोर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Devendra Fadnavis : बाकी कुणाकडून अपेक्षा नाही पण देवेंद्र फडणवीसांकडून मोठ्या अपेक्षा आहेत असं सांगत आमदार सुरेश धस यांनी फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला. 

बीड : सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असून ते एकदा मागे लागले तर डोकं खातात असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. महायुतीचं सरकार असताना त्यांनी मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मेहनत घेतल्याचं सांगत फडणवीसांनी सुरेश धस यांचे कौतुक केलं.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आष्टी येथील कुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन करण्यात आलं. त्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. या तलावामुळे दुष्काळी आष्टी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

आमदार सुरेश धस यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली असा केला. आमदार सुरेश धस यांच्याकडून भरसभेत फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. बाकी कोणाकडून अपेक्षा नाही, पण देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा आहे असं धस म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आपल्याला जलसंधारण खातं मिळालं. त्यावेळी सुरेश धस मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर अगदी मागेच लागायचे. ते सातत्याने पाठपुरवठा करायचे. सुरेश धस मागे लागले की डोके खावून टाकतात."

मराठवाड्याचा दुष्काळ आता भूतकाळ होणार

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मराठवाड्याला कृष्णा खोरेचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी गोपीनाथ मुंडे आणि मराठवाड्याततील अनेक नेत्यांनी केला. पण दुर्दैवाने ते सगळे काम पूर्ण झाले नाही. 23 टीएमसी पाण्यापैकी केवळ 7 टीएमसी पाणी सापडले.  या भागाचा दुष्काळ आता भूतकाळ होणार आहे. जो पर्यंत पश्चिमी वाहिन्यांचे पाणी, थेट समुद्रात जाणारे पाणी गोदावरीमध्ये आणीत नाहीत तोपर्यंत मराठवाडा दुष्काळ मुक्त होणार नाही. त्यासाठी गोदावरीच्या एकात्मिक आराखडा बनवला आहे. त्या माध्यमातून 53 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आले पाहिजे."

या संदर्भात 2019 साली आपण जीआर काढला. मात्र नंतर सरकार गेल्याने यावर कारवाई झाली नाही असं फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, "मी माझे भाग्य समजतो पुन्हा माझ्यावर जलसिंचनची जबाबदारी आली. या प्रकल्पाचे सगळे अडथळे दूर केले. येत्या वर्षभरात नदी जोड प्रकल्पाचा काम सुरू करू. त्यामुळे जायकवाडीमध्ये पाणी वाढणार आहे. त्यानंतर जायकवाडीमधून पाणी इकडे आणू."

मराठवाड्याच्या दुसऱ्या पिढीला दुष्काळ बघू द्यायचा नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यातील सगळ्या उपसा सिंचन योजना आपण सोलर वर टाकत आहोत. ही योजना सुद्धा सोलरवर चालणार आहे. आमच्या शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी म्हणून आम्ही स्वतंत्र योजना बनवली असून एकूण 16 हजार मेगावॉट वीज सोलर मधून वीज मिळणार आहे. या पुढे 8 रुपये ऐवजी ही वीज फक्त तीन रुपये युनिटने पडणार आहे."

संतोष देशमुख यांच्या खुनाच्या प्रकरणात सगळ्यांवर कारवाई होणार. या ठिकाणी सगळ्यांना गुण्या गोविंदाने राहायचे आहे. आपण नवीन बीड तयार करू असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

बीडच्या आष्टीतील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आमदार सुरेश धस यांनी जोरदार बॅटिंग केली. बीडची बदनामी कोण करतंय, यावर देखील धस यांनी भाष्य केलं. तर दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फडणवीसांनी कशी सहकार्याची भूमिका घेतली यांचे धस यांनी दाखले दिले. मेरे पास देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद है, अशी डायलॉगबाजीदेखील धस यांनी यावेळी केली. 

 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Karuna Sharma on Pankaja Munde and Dhananjay Munde: पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका
पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget