एक्स्प्लोर

Beed Crime News: शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट; समाधान मुंडेला बदडणाऱ्या भागवत साबळे,सुरेश साबळेसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल, आईने केली तक्रार

Beed Crime News: समाधान मुंडे मारहाण प्रकरणी भागवत साबळे, सुरेश साबळे याच्यासह इतर आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड/परळी - परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. दिवटेला मारहाण करणारा समाधान मुंडे या तरुणाला आधी बेदम मारहाण झाली होती. त्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला. या प्रकरणात परळीमध्ये गुन्हा दाखलची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. आधी मारहाण झाल्याने बदला घेण्यासाठीच शिवराज  दिवटेला मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे आता या प्रकरणात  नवा ट्विस्ट समोर आला आहे.

बीडमधील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. परळीतील जलालपूर येथे जमावाकडून समाधान मुंडे व ऋषिकेश गिरी यांना मारहाण करण्याची घडली होती, या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्या विरोधात समाधान याच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान मुंडे हा ऋषिकेश गिरी याला सोडण्यासाठी मोटरसायकलवरून जात असताना जलालपूर येथे चौकामध्ये भागवत साबळे व सुरेश साबळे यांच्यासह इतर सात ते आठ जणांनी त्यांना अडवून जीवे मारण्याच्या उद्देशाने काठी लाथा बुक्क्या व बेल्टने मारहाण केल्याची या तक्रारीत म्हटले आहे.आता या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी शहर पोलीस करत आहेत. 

समाधान मुंडे व ऋषिकेश गिरी हे शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी असून आता या दोघांना मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात समाधान मुंडेच्या आईने तक्रार केली आहे, जलालपूरमध्ये मारहाण झाली होती, त्यानंतर आता शिवराज दिवटे मारहाण प्रकरणात ट्विस्ट आला आहे. 16 मे रोजी परळीतील जलालपूर येथे सप्ताहाचा कार्यक्रम होता. त्यासाठी शिवराज दिवटे (वय 18, रा. लिंबोटी, ता. परळी) हा मित्रांसोबत गेला होता. त्याठिकाणी किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचे अपहरण करून त्याला निर्जनस्थळी नेत रिंगण करून बेदम मारहाण झाली होती. त्यानंतर पायाही पडायला लावले होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिवराजच्या जबाबावरून 20 जणांवर गुन्हा दाखल झाला असून, सातजण पोलिसांच्या ताब्यात आहेत. दरम्यान, शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी  समाधान मुंडेलाही जलालपूरमध्ये मारहाण झाल्याचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला होता. 

 शिवराज दिवटे मारहाण प्रकरण काय?

परळीतील गुन्हेगारांच्या एका टोळक्याने आपल्या भांडणात सहभागी असल्याच्या संशयावरून एका तरुणाला उचलून जवळच्या निर्जनस्थळी जंगलात नेलं. तेथे त्याला 18 ते 20 जणांनी लाठ्याकाठ्या, बेल्ट, रॉडने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली. ही खळबळजनक घटना शुक्रवारी( ता,16) दुपारी परळीजवळील रत्नेश्वर मंदिराच्या आवारातील जंगलात घडली. विषेश म्हणजे आरोपींनी या मारहाणीचा व्हिडीओही बनवला. शिवराज नारायण दिवटे (वय 18) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी आंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परळी पोलिस ठाण्यात वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील सचिन मुंडे, समाधान मुंडे, रोहण वाघुळकर, अदित्य गित्ते, तुकाराम उर्फ रुषीकेश गिरी यासह दोन अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील पाच आरोपींना २० मेपर्यंत पोलिस कोठडी सुणावण्यात आली आहे. रोहित मुंडे (रा. डाबी), प्रशांत कांबळे (रा. परळी), सुरज मुंडे (रा. टोकवाडी) व स्वराज गित्ते (रा. परळी) यांच्यासह अनोखळी दहा आरोपी फरार आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न
डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न
lalbaugcha raja ganpati visarjan : लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, उद्धव ठाकरेंचा सचिव सुधीर साळवींना फोन, कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला
लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, उद्धव ठाकरेंचा सचिव सुधीर साळवींना फोन, कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला
वनराज आंदेकरचा भाचा आयुष कोमकरचा खून होईल याचा अंदाज नव्हता: पुणे पोलीस आयुक्तांची कबुली
वनराज आंदेकरचा भाचा आयुष कोमकरचा खून होईल याचा अंदाज नव्हता: पुणे पोलीस आयुक्तांची कबुली
पाऊस की उघडीप! पुढील पाच दिवस राज्यात कसं असेल हवामान? जाणून घ्या हवामानाचा अंदाज 
पाऊस की उघडीप! पुढील पाच दिवस राज्यात कसं असेल हवामान? जाणून घ्या हवामानाचा अंदाज 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalbaugcha Raja Visarjan 2025 : डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न
डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' गर्दीच्या महासागरात ‘तो शेवटचा दर्शनाचा क्षण’, लालबागचा राजाचे विसर्जन संपन्न
lalbaugcha raja ganpati visarjan : लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, उद्धव ठाकरेंचा सचिव सुधीर साळवींना फोन, कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला
लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, उद्धव ठाकरेंचा सचिव सुधीर साळवींना फोन, कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला
वनराज आंदेकरचा भाचा आयुष कोमकरचा खून होईल याचा अंदाज नव्हता: पुणे पोलीस आयुक्तांची कबुली
वनराज आंदेकरचा भाचा आयुष कोमकरचा खून होईल याचा अंदाज नव्हता: पुणे पोलीस आयुक्तांची कबुली
पाऊस की उघडीप! पुढील पाच दिवस राज्यात कसं असेल हवामान? जाणून घ्या हवामानाचा अंदाज 
पाऊस की उघडीप! पुढील पाच दिवस राज्यात कसं असेल हवामान? जाणून घ्या हवामानाचा अंदाज 
शॉर्ट सर्किटमुळं मुंबईत इमारतीला भीषण आग !  गुदमरून 80 वर्षीय महिलेचा मृत्यू, 5-6 गंभीर
शॉर्ट सर्किटमुळं मुंबईत इमारतीला भीषण आग ! गुदमरून 80 वर्षीय महिलेचा मृत्यू, 5-6 गंभीर
Pune Metro: विसर्जन मिरवणूक बघून घरी जाण्यासाठी पुणेकरांनी मेट्रोकडे धाव घेतली, मेट्रोतील तुफान गर्दीचे Video व्हायरल
विसर्जन मिरवणूक बघून घरी जाण्यासाठी पुणेकरांनी मेट्रोकडे धाव घेतली, मेट्रोतील तुफान गर्दीचे Video व्हायरल
मतदार फसवणूक प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती देता देता का बंद केली, निवडणूक आयोग भाजपचं बॅक ऑफिस झालं आहे का? मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
मतदार फसवणूक प्रकरणात महत्त्वपूर्ण माहिती देता देता का बंद केली, निवडणूक आयोग भाजपचं बॅक ऑफिस झालं आहे का? मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
Jaykumar Gore : IPS अंजना कृष्णा अन् अजित पवारांच्या वादात जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, कुर्डूमधील कारवाई योग्यच, शासनातील कोणीही त्यांच्या पाठीशी राहणार नाही!
IPS अंजना कृष्णा अन् अजित पवारांच्या वादात जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, कुर्डूमधील कारवाई योग्यच, शासनातील कोणीही त्यांच्या पाठीशी राहणार नाही!
Embed widget