एक्स्प्लोर

अडीच लाखांचं कर्ज, सावकाराचा तगादा, पत्नीला आणून सोड म्हणताच आयुष्य संपवलं, बीडच्या प्रकरणात दोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Beed News: वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यांनी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.

Beed News:बीडच्या पेठ भागातील कापड व्यावसायिक राम फटाले यांनी सावकारी जाच सहन न झाल्याने 2 जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक बाब समोर आली आहेत. वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, अशी धमकी सावकाराने व्यक्तीला दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या कपडा व्यावसायिकाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आता या घटनेनंतर राम फटाले आणि मुख्य आरोपी असलेल्या सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्यातील दोन कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडालीय.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी तीन आरोपींना 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी फटाले यांनी चार पानी सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये सावकारी जाच, दमदाटी आणि मानसिक त्रास यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

काय आहे या रेकॉर्डिंगमध्ये?

तू माझ्या हॉस्पिटलमध्ये तुझ्या वडिलांना घेऊन ये तसेच माझी मुद्दल मला दे.. कधी देतोस ते सांग? तू नाही आलास तर मला तुझ्या घरी पोरं घेऊन यावं लागेल.. अशा प्रकारे जाधव धमकावत आहे.

तर दुसऱ्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये दोन रूपये टाकले वरचे चारशे रुपये तुझा बाप टाकणार आहे का?.. अशा प्रकारची भाषा सावकार डॉक्टर लक्ष्मण जाधव वापरत असल्याचं या कॉल रेकॉर्डिंग मधून समोर आलं. तुला पैसे देणं होत नसेल तर तुझी बायको माझ्या घरी आणून सोड अशा प्रकारची भाषा वापरल्याचा देखील फिर्यादीमध्ये उल्लेख आहे.

अडीच लाखाचं कर्ज, सावकारी तगादा, मानसिक छळ अन् आत्महत्या

बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असणारे राम फटाले यांनी सात वर्षांपूर्वी सावकाराकडून अडीच लाख रुपये 10 टक्के व्याजाने उसने घेतले होते. याची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिनाप्रमाणे करण्यात आली. मात्र, पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता. तुझ्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड, असे म्हणत सावकाराने राम फटाले यांचा मानसिक छळ केला. वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यांनी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : रिव्हॉल्वर घेऊन न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर, कमरेला हात लावताच पोलिसांना संशय; कोल्हापुरात सुरक्षेचे धिंडवडे
रिव्हॉल्वर घेऊन न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर, कमरेला हात लावताच पोलिसांना संशय; कोल्हापुरात सुरक्षेचे धिंडवडे
समृद्धी महामार्गावरुन 121 किलो गांजाची तस्करी; पोलिसांचे सायरन वाजले, सिनेस्टाईल पाठलाग, तिघांना अटक
समृद्धी महामार्गावरुन 121 किलो गांजाची तस्करी; पोलिसांचे सायरन वाजले, सिनेस्टाईल पाठलाग, तिघांना अटक
नाशिकमधील 'त्या' दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; तक्रारदारानेच मागे घेतला गुन्हा
नाशिकमधील 'त्या' दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; तक्रारदारानेच मागे घेतला गुन्हा
करमाळ्यात भाजपच्या शहराध्यक्षावर खुनी हल्ला, कोयत्यासह काठ्यांनी केली मारहाण, गुन्हा दाखल  
करमाळ्यात भाजपच्या शहराध्यक्षावर खुनी हल्ला, कोयत्यासह काठ्यांनी केली मारहाण, गुन्हा दाखल  
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Non Veg Man:आयुष्यात कधीही शाकाहार न केलेला अवलिया; ना ब्लडप्रेशर, ना शुगर; 65 वर्षे खणखणीत
Pravin Gaikwad Ink Attack | प्रविण गायकवाडांवर शाईफेकणाऱ्यांवर कारवाई करणार, देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन
Thackeray Reunion | महायुतीला ठाकरे बंधू एकत्र येण्याची भिती, संजय राऊतांनी डिवचलं
Thackeray Reunion | विजयी मेळाव्याचा युतीशी संबंध नाही,राज ठाकरेंच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
Thackeray Alliance | विजय मेळावा राजकीय नाही, युतीचा निर्णय नोव्हेंबर-डिसेंबरनंतर!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : रिव्हॉल्वर घेऊन न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर, कमरेला हात लावताच पोलिसांना संशय; कोल्हापुरात सुरक्षेचे धिंडवडे
रिव्हॉल्वर घेऊन न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर, कमरेला हात लावताच पोलिसांना संशय; कोल्हापुरात सुरक्षेचे धिंडवडे
समृद्धी महामार्गावरुन 121 किलो गांजाची तस्करी; पोलिसांचे सायरन वाजले, सिनेस्टाईल पाठलाग, तिघांना अटक
समृद्धी महामार्गावरुन 121 किलो गांजाची तस्करी; पोलिसांचे सायरन वाजले, सिनेस्टाईल पाठलाग, तिघांना अटक
नाशिकमधील 'त्या' दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; तक्रारदारानेच मागे घेतला गुन्हा
नाशिकमधील 'त्या' दोन नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा; तक्रारदारानेच मागे घेतला गुन्हा
करमाळ्यात भाजपच्या शहराध्यक्षावर खुनी हल्ला, कोयत्यासह काठ्यांनी केली मारहाण, गुन्हा दाखल  
करमाळ्यात भाजपच्या शहराध्यक्षावर खुनी हल्ला, कोयत्यासह काठ्यांनी केली मारहाण, गुन्हा दाखल  
गुरुपौर्णिमेला साई दरबारी भक्तांचं भरभरुन दान; तीन दिवसांत सोनं-नाणं, कॅश अन् ऑनलाईही देणगी, रक्कम किती?
गुरुपौर्णिमेला साई दरबारी भक्तांचं भरभरुन दान; तीन दिवसांत सोनं-नाणं, कॅश अन् ऑनलाईही देणगी, रक्कम किती?
ना CV ना डीग्री! 'ही' कंपनी देतेय 1 कोटी रुपयांची नोकरी, नेमकी प्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
ना CV ना डीग्री! 'ही' कंपनी देतेय 1 कोटी रुपयांची नोकरी, नेमकी प्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
टॉप 5 मधील मंत्रिपदासाठी भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा, जयंत पाटील हसत हसत म्हणाले, पराचा कावळा कशाला करता!
टॉप 5 मधील मंत्रिपदासाठी भाजप प्रवेश रखडल्याची चर्चा, जयंत पाटील हसत हसत म्हणाले, पराचा कावळा कशाला करता!
EPFO : नोकरी करत असताना किती PF काढू शकता? कोणत्या कारणासाठी किती पैसे मिळतात? जाणून घ्या काय आहेत नियम
नोकरी करत असताना किती PF काढू शकता? कोणत्या कारणासाठी किती पैसे मिळतात? जाणून घ्या काय आहेत नियम
Embed widget