एक्स्प्लोर

Beed Bank Scam : बीडमधील बँकेत 13 कोटींचा अपहार; बांगर यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना अटक

Beed Bank Scam : बनावट कागदपत्रांच्या आधारे 13 कोटींच्या कर्जाचा अपहार केल्याप्रकरणी पाटोदा  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामकृष्ण बांगर यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. 

बीड : जिल्ह्यातील पाटोदा येथील महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये झालेल्या अपहार प्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामकृष्ण बांगर यांच्या पत्नी सत्यभामा बांगर यांना पाटोदा पोलिसांनी अटक केली आहे. 13 कोटींच्या अपहार प्रकरणी ही अटक करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

सन 2011 ते 2015 कालावधी दरम्यान महात्मा फुले अर्बन बँकेमध्ये 13 कोटींचा बनावट दस्तावेज सादर करून सत्यभामा बांगर यांनी अपहार केल्याचा आरोप आहे. रामकृष्ण बांगर यांनी देखील पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असताना बाजार समितीची जमीन बळकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात देखील गुन्हा नोंद झाला होता. आता त्यांच्या पत्नी बँकेच्या अपहार प्रकरणात अडचणीत आल्या असून त्यांना अटक झाली आहे. 

सत्यभामा बांगर यांनी कोणतीही कागदपत्रं न घेता, तारण न घेता बनावट कागदपत्रं तयार करून ते खरी असल्याचं भासवून 13 कोटी रुपयांचे कर्ज उचलले होते. आता याच प्रकरणात बांगर कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

बीडमधील 300 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी बबन शिंदे यांना अटक

तीनशे कोटींचा अपहार करून फरार असलेल्या जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेटचा अध्यक्ष बबन शिंदे याला उत्तर प्रदेशच्या वृंदावन येथे बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून शिंदे फरार होता आणि तो पोलिसांना चकवा देत होता. 

बीडसह जिल्ह्यात पाच ठिकाणच्या शाखांमधून बबन शिंदे याने तीनशे कोटींपेक्षा अधिकच्या ठेवी गोळा केल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी मल्टीस्टेट बंद करून तो फरार झाला. या प्रकरणात बीडसह पाच ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. आता बीड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

बीड जिल्ह्यामध्ये अनेक बँकांकडे हजारो ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. या घोटाळ्याच्या मालिकेतील सर्वात आधी गुंतवणूकदाराची मोठी फसवणूक बबन शिंदे याच्या मल्टीस्टेट बँकेने केली होती.

बीडमध्ये ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट बँकेच्या अध्यक्षा अनिता शिंदे आणि त्यांचे पती बबन शिंदे यांच्यासह सर्व संचालक मंडळावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ही बातमी वाचा: 

                   

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अपघाताच्या दोन भीषण घटनांत दोघे ठार, अंबोली घाटात चिमुकली तर बीडमध्ये दुचाकीवरील युवकाचा मृत्यू
अपघाताच्या दोन भीषण घटनांत दोघे ठार, अंबोली घाटात चिमुकली तर बीडमध्ये दुचाकीवरील युवकाचा मृत्यू
Beed Crime News: निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला, शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराकडून भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला, बीडमधील थरारक घटना
निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला, शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराकडून भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला, बीडमधील थरारक घटना
Santosh Deshmukh : संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला, माझ्या खच्चीकरणासाठी प्रयत्न केले गेले; धनंजय देशमुखांचा दावा
संतोष देशमुख केस मागे घेण्यासाठी दबाव टाकला, माझ्या खच्चीकरणासाठी प्रयत्न केले गेले; धनंजय देशमुखांचा दावा
Beed News : शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार? कपाटात सापडली पुस्तकांसह जादूटोण्याचे साहित्य अन् नशेचे औषधे; बीडच्या अंबाजोगाईतील धक्कादायक प्रकार
शाळेतून ख्रिश्चन धर्माचा प्रसार? कपाटात सापडली पुस्तकांसह जादूटोण्याचे साहित्य अन् नशेचे औषधे; बीडच्या अंबाजोगाईतील धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle Funeral: लाडक्या आजीला शेवटचं पाहून जनाईला अश्रू अनावर; आशा भोसलेंचं पार्थिव पाहून सारेच गलबलून गेले
लाडक्या आजीला शेवटचं पाहून जनाईला अश्रू अनावर; आशा भोसलेंचं पार्थिव पाहून सारेच गलबलून गेले
उत्तर प्रदेशात पगारवाढीसाठी सहा कंपन्यातील कामगारांचा एकाचवेळी उद्रेक; पोलिसांची वाहने उलथवून टाकली, कंपनीवर तुफान दगडफेक, महिला कर्मचारी सुद्धा रस्त्यावर
उत्तर प्रदेशात पगारवाढीसाठी सहा कंपन्यातील कामगारांचा एकाचवेळी उद्रेक; पोलिसांची वाहने उलथवून टाकली, कंपनीवर तुफान दगडफेक, महिला कर्मचारी सुद्धा रस्त्यावर
Iran War Live Update: आकाशातून 40 दिवस रक्तरंजित संघर्षानंतर आता पर्शियन समुद्रामध्ये सुद्धा घनघोर संघर्ष सुरू होणार? 'होमुर्झ'वरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
आकाशातून 40 दिवस रक्तरंजित संघर्षानंतर आता पर्शियन समुद्रामध्ये सुद्धा घनघोर संघर्ष सुरू होणार? 'होमुर्झ'वरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कला केंद्रावर धुमाकूळ, तलवारी नाचवल्या, कला केंद्र फोडलं, धाक दाखवून महिलांचे दागिने, पैसे लुटले
धाराशिवमध्ये कला केंद्रावर धुमाकूळ, तलवारी नाचवल्या, कला केंद्र फोडलं, धाक दाखवून महिलांचे दागिने, पैसे लुटले
Ashok Kharat Crime news: अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...'
अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...'
Share Market Today: बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली
बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली
Virat Kohli Meet Sachin Tendulkar MI vs RCB IPL 2026: मिठी मारली, 'गुरु'ने शिष्याची पाठ थोपटली; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची भेट, PHOTO
मिठी मारली, 'गुरु'ने शिष्याची पाठ थोपटली; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची भेट, PHOTO
Pandharpur Crime News: पंढरपूरमध्ये पाणीपुरी खाताना तरुणीच्या तोंडावर अज्ञाताने फेकला ज्वलनशील पदार्थ, डॉक्टरांनी एक डोळा वाचवला, पण दुसरा... डॉक्टर काय म्हणाले?
पंढरपूरमध्ये पाणीपुरी खाताना तरुणीच्या तोंडावर अज्ञाताने फेकला ज्वलनशील पदार्थ, डॉक्टरांनी एक डोळा वाचवला, पण दुसरा... डॉक्टर काय म्हणाले?
Embed widget