युवकाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांना मी सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या केलेल्या अर्जुन कवठेकर (Arjun Kawthekar) या तरुणाच्या कुटुंबियांची आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भेट घेतली.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आत्महत्या केलेल्या बीड जिल्ह्यातील अर्जुन कवठेकर (Arjun Kawthekar) या तरुणाच्या कुटुंबियांची आज मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी भेट घेतली. यावेळी पीडित कुटुंबाला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं. बाबांनो आत्महत्या करु नका, मी आरक्षण देईनच असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार असल्याचेही जरांगे म्हणाले.
कोणीही आत्महत्या करू नका मी आरक्षण देण्यास समर्थ
मराठा समाजाला सरकार आरक्षण देत नाही, सरकार शब्द पाळत नाही अशा आशयाची चिठ्ठी लिहून अर्जुन कवठेकर या तरुणाने आज गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मनोज जरांगे पाटील यांना आत्महत्याग्रस्त तरुणाच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. कोणीही आत्महत्या करू नका मी आरक्षण देण्यास समर्थ आहे. असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले.
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार
अर्जुन कवठेकर या तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोहीघे जबाबदार आहेत. आता मी यांना सोडणार नाही असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. आरक्षण देत कसे नाहीत हे मी पाहतो. मात्र तरुणांनी आत्महत्या करून कुटुंब उघड्यावर आणू नये असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले. बीडच्या जिल्हा परिषद कार्यालय परिसरात झाडाला गळफास घेत अर्जुन कवठेकर यांनी जीवन संपवलं आहे.
कुटुंबीयांना पाहून मनोज जरांगेंना देखील अश्रू अनावर
मनोज जरांगे पोहचताच कुटुंबाने एकच टाहो फोडला. तर कुटुंबीयांना पाहून मनोज जरांगेंना देखील अश्रू अनावर झाले. यावेळी अर्जुन कवठेकर यांचे यांचे वृद्ध आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि अन्य नातेवाइकांनी हंबरडा फोडला. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी सुनीलची भावना होती आणि ते आरक्षण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच मिळू शकेल असा विश्वासही त्यांना होता, असे त्यांच्या नातेवाइकांनी जरांगे यांना सांगितले. जरांगे यांनी तासभर बसून कावळे कुटुंबीयांचे सांत्वन केले. सांत्वन करताना जरांगे यांचे डोळेही पाणावले होते. त्यांच्याशी संवाद साधताना मराठा समाज कवठेकर कुटुंबीयांना उघड्यावर सोडणार नाही. समाजासाठी दिलेले बलिदान समाज कदापि विसरणार नाही, अशी ग्वाही दिली.
महत्वाच्या बातम्या: