Beed Accident: दुसऱ्या बसमध्ये चढताना बाजूच्या बसने प्रवाशाला चिरडले,अंबाजोगाई बस स्थानकात भीषण अपघात
या अपघातात प्रवासाचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातामुळे बस स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .

Beed Accident: बीडमध्ये अपघातांचा सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीय .बीडच्या अंबाजोगाई मध्ये बस स्थानकावर सकाळी भीषण अपघात घडलाय .दुसऱ्या बसमध्ये चढत असताना बाजूला उभ्या असलेल्या एका बस ने प्रवाशाला चिरडले आहे .या अपघातात प्रवासाचा जागीच मृत्यू झाला असून या अपघातामुळे बस स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे . अंकुश मोरे असे मृत प्रवाशाचे नाव आहे . (Beed News)
नेमके घडले काय ?
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बस स्थानकावर भीषण अपघात झालाय . दुसऱ्या बस मध्ये चढताना बाजूने आलेल्या बसने प्रवाशाला चिरडले आहे .यात प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे .की दुर्घटना बस स्थानकाच्या आवारात सकाळी घडली .अंकुश मोरे हे दुसऱ्या बस मध्ये चढत असताना शेजारी उभ्या असलेली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस प्रवाशाच्या अंगावरून गेली .या अपघातात अंकुश मोरे या प्रवासाचा जागीच मृत्यू झाला .या प्रकारामुळे काही काळ बस स्थानकावर मोठी खळबळ उडाली होती . चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बीडमधून भीषण अपघाताची घटना समोर आली होती.
बीडच्या गढी पुलावर भीषण अपघात
बीड जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यात बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण अपघात (Accident News) झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. गेवराई शहरानजीक असणाऱ्या गढी पुलावर एका एसयूव्ही वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात (Accident) झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी गाडीतील सर्वजण बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने या सहा जणांना जोरदार धडक दिली आणि यात यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा























