धक्कादायक! बीडमध्ये 843 ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्या, पस्तीशीतच आरोग्यविषयक नरकयातनांना सुरुवात
प्रजनन आरोग्य पातळीवर सरकार याकडे लक्ष देत नाही.. सरकारने यांना मानधन दिले पाहिजे अशी मागणी ऊसतोड कामगार संघटनेने केलीय...

Beed: बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.. प्रत्येक वर्षी जिल्ह्यातून जवळपास दीड लाखाहून अधिक ऊसतोड मजुरांचे स्थलांतर होते. मात्र याच स्थलांतरा दरम्यान 843 ऊसतोड महिला कामगाराच्या गर्भपिशव्या काढल्याच्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या महिलांमध्ये 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे गेल्या अनेक वर्षांपासून ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. पण तरीही बीडमध्ये महिलांच्या गर्भपिशव्या आजही काढल्या जातात.
बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर दिवाळी दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात ऊस तोडणीसाठी जातात. सहा महिने ऊस तोडणी करून जानेवारी महिन्यापर्यंत त्यांचा परतीचा प्रवास असतो.. आरोग्य विभागाकडून ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांचे आरोग्य तपासणी करण्यात येते.. यादरम्यान जिल्ह्यातील 843 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचं दिसून आले.. प्रजनन आरोग्य पातळीवर सरकार याकडे लक्ष देत नाही.. सरकारने यांना मानधन दिले पाहिजे अशी मागणी ऊसतोड कामगार संघटनेने केलीय...
गर्भपिशवी काढल्यानंतर आरोग्याच्या गंभीर समस्या
या महिलांनी गर्भपिशवी काढल्यानंतर अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांना मासिक पाळीत रक्तस्त्राव होणे, जंतुसंसर्ग, पोटात दुखणे अशा लक्षणांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांमुळे त्यांना गर्भपिशवी काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. गर्भपिशवी काढल्यानंतर आता मात्र असंख्य आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
बीड तालुक्यातील काठवडा गावातील लता वाघमारे मागील 20 वर्षांपासून ऊसतोडणी करतात.. मात्र तोडणी दरम्यान अंगावरून जाणे, मासिक पाळीत रक्तस्त्राव होणे, जंतुसंसर्ग पोटात दुखणे अशी लक्षणे दिसून आली.. त्यामुळे त्यांना गर्भपिशवी काढण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.. गर्भपिशवी काढल्यानंतर आता मात्र असंख्य आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे..30 ते 35 वयोगटातील महिलांचा देखील यामध्ये समावेश आहे.. तर ज्या महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ऊस तोडणी करतात, त्यांनी दहा ते पंधरा वर्षांपूर्वी गर्भपिशवी काढली त्यामुळे आता मरण यातना सहन कराव्या लागत असल्याचं महिलांनी सांगितले..
हेही वाचा
टोमॅटो उत्पादकांचे अडीच कोटी रुपये थकवले, नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक, कांद्याचे लिलाव पाडले बंद























