Crime News : प्रेयसीला जिवंत जाळणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, बीडच्या सत्र न्यायालयाचा निकाल
Crime News : प्रेयसीला जिवंत जाळणाऱ्या आरोपीला बीडच्या (Beed) जिल्हा व सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Crime News : प्रेयसीला जिवंत जाळणाऱ्या आरोपीला बीडच्या (Beed) जिल्हा व सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील एका तरुणाने आपल्या प्रियसीवर अॅसिड आणि पेट्रोल टाकून तिचा खून केला होता. याप्रकरणी पोलिसात (Police) गुन्हा दाखल होऊन न्यायालयात खटला सुरू होता. याच प्रकरणी न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
गेल्या वर्षभरापासून प्रियकरासोबत पुण्यामध्ये राहणारी नांदेड जिल्ह्यातील तरुणी दिवाळीसाठी गावाकडे जात होती. त्यावेळी रात्रीच्या वेळी रस्त्याच्या निर्जनस्थळी नेऊन प्रियकराने तिच्या अंगावर अॅसिड टाकले आणि त्यानंतर पेट्रोल टाकून तिला पेटवले होते. यामध्ये तरुणी 48 टक्के भाजली होती. यामध्ये त्या तरुणीचा मृत्यू झाला होता.
नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यात घडली होती घटना
नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगाव येथील सावित्रा दिगंबर अंकुरवार असं पीडित तरूणीचं नाव आहे. ही तरुणी त्याच गावातील तरुण अविनाश राजुरे यांच्यासोबत दुचाकीवरुन गावी जात होती. रात्री उशिरा केज-बीड रोडवर येळंब घाटाजवळ आल्यानंतर अविनाशने सावित्राला रस्त्यापासून काही दूर असलेल्या दगडाच्या खदानीकडे नेऊन तिच्यावर अॅसिड टाकले होते. त्यानंतर ती वीवळत असल्यानं आरोपीमं तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते.
उपचारादरम्यान बीड जिल्हा रुग्णालयात तरुणीचा झाला होता मृत्यू
दरम्यान, या घटनेनंतर हा प्रियकर तिथून पळून गेला होता. मात्र, रस्त्याच्या कडेला एका निर्जनस्थळी विव्हळत पडलेल्या या तरुणीकडे कोणाचाही लक्ष गेलं नाही. अखेर रस्त्यावरुन जाणऱ्यांनी काही जणांनी आठ तासानंतर त्या तरुणीला बघीतले. त्यानंतर याबाबत त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस आले आणि त्या तरुणीला उपचारासाठी सुरुवातीला नेकनूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, दुर्दैवानं उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन न्यायालयात खटला सुरु होता. अखेर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. आरोपीला बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: