(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मीरा बोरवणकरांच्या पुस्तकातली अजित पवारांबद्दलची नोंद म्हणजे, बीनाकामाचा भडका; धनंजय मुंडे थेटच बोलले
Beed News: अजित पवारांबद्दल पुस्तकात असलेली नोंद म्हणजे बीनाकामाचा भडका, असं कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Beed News Updates: मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांच्या पुस्तकातली जमिनी लिलावाची नोंद म्हणजे, फक्त बिनकामाचा भडका, असं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Agriculture Minister Dhananjay Munde) यांनी कुठल्याही पालकमंत्र्याला सरकारी जमिनीचा लिलाव करता येत नसतो, असं स्पष्ट केलं. तसेच, बीड जिल्हा बँक (Beed District Bank) बंद पडल्यानंच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असल्याचं धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटलं आहे. दरम्यान, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासासंदर्भात आणि शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे. काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत.
बीड जिल्हा बँक बंद पडल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न विचारल्यानंतर बीड जिल्ह्यामधील जिल्हा बँकही बंद पडल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. लवकरच जिल्हा बँक आता पुनर्जीवित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जिल्हा बँक बंद पडल्यानं शेतकऱ्यांना बाहेरून जास्तीच्या व्याजानं पैसे घ्यावे लागले, त्यामुळे व्याजाचे पैसे आणि दुष्काळ तर कधी गारपीट यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बीड जिल्ह्यातली ही परिस्थिती आता बदलायची असून जिल्हा बँक देखील पुन्हा नव्या जोमानं सुरू करणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
अजित पवारांबद्दल पुस्तकात नोंद म्हणजे बीनाकामाचा भडका
अजित पवार यांनी जमिनीचा लिलाव केल्याची नोंद मीरा बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात केल्यानंतर अजित पवार गट आणि विरोधकांमध्ये सध्या चांगला संघर्ष पाहायला मिळत आहे. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, पुस्तकातली जमिनी लिलावाची नोंद म्हणजे, फक्त बिनकामाचा भडका असून कुठल्याही पालकमंत्र्याला सरकारी जमिनीचा लिलाव करता येत नसतो. हे पुनर्लक्षित प्रकरण असल्याचा धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
सरकार पुर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी, दुष्काळ निवारण्याचं नियोजन झालं : धनंजय मुंडे
आमचं सरकार हे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून जर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर बीड जिल्ह्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून देण्यासाठीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर पाण्याची कमतरता भासल्यास विहिरीच्या अधिग्रहण करण्याचे आदेश देखील जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तर आगरीम पिक विम्याच्या संदर्भात अधिसूचित झालेल्या सर्व मंडळाला दिवाळीच्या अगोदर पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. नमो शेतकरी सन्मान योजना ही अधिक बळकट करण्यासाठी सहा हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.